Horror Thriller Web Series : हादरवणारा क्लायमॅक्स, प्रत्येक एपिसोड धडकी भरवणारा, 'ही' हॉरर -थ्रिलर वेबसीरिज पाहिलीत!
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Horror Thriller Web Series : हॉरर आणि थरार नाट्य असणारी वेब सीरिज पाहण्याची इच्छा असणाऱ्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरची ही सीरिज घरबसल्या नक्की पाहा.
OTT Horror Thriller Web Series : ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकांमध्ये वेब सीरिज पाहण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. लोकांना आता घरबसल्या वेब सीरिज पाहण्याची आवड निर्माण झाली आहे. वेबसीरिजच्या दमदार कथा प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. वेब सिरीजमध्येही प्रेक्षकांना सस्पेन्स, थ्रिल आणि हॉरर अशा सर्व गोष्टींची सांगड असलेलं पाहायला मिळत आहे. अशाच एका जबरदस्त सीरिजबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जी पाहून तुमच्या हृदयात धडधड सुरू होईल. विशेष म्हणजे ही सीरिज पाहिल्यानंतर तुम्हाला एकट्याने कुठेही जाणं खूपच भीतीदायक वाटेल. ही सिरीजला तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच समाविष्ट करा.
हॉरर, थ्रिलर सीरिज पाहायची?
हॉरर, थ्रिलर सीरिजची आवड असणाऱ्यांसाठी 'अधूरा' हा एक उत्तम पर्याय आहे. या सीरिजची जबरदस्त कथा तुमचं भान हरपवून टाकेल. ही सीरिज पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या खोलीतूनही बाहेर पडायला भीती वाटेल. या भुताटकी सीरिजला पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी मनाची तयारी करावी लागेल. भावुक स्वभावाच्या असणाऱ्यांनी मात्र ही सीरिज आपल्या स्वतःच्या रिस्कवर पाहावी. या सीरिजमध्ये एकूण 7 एपिसोड्स आहेत आणि प्रत्येक एपिसोड धडकी भरवणारा आहे.
advertisement
काय आहे 'अधूरा'?
'अधूरा' या सीरिजमध्ये एका हॉस्टेल आणि तिथे राहणाऱ्या छोट्या मुलांची कथा दाखवण्यात आली आहे. त्या हॉस्टेलमधल्या एका लहान मुलाला भूत दिसतं. वेळ जसा-जसा पुढे सरकतो तसं ते भूत अती करू लागतं. हॉस्टेलमध्ये एकामागून एक हत्या होऊ लागतात. या सगळ्या घटनांमुळे शाळेचं प्रशासन चिंता व्यक्त करतं. एकंदरीतच या सीरिजची थरारक गोष्ट लक्ष वेधून घेते. विशेषतः या सीरिजचा क्लायमॅक्स तुमचं मन हादरवून टाकेल.
advertisement
'अधुरा' ही वेब सीरिज 2023 साली प्रदर्शित झाली होती आणि तुम्ही ती अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
या सीरिजमध्ये ईशाक सिंह आणि रसिका दुग्गल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. IMDb वर या सीरिजवा 6.6 रेटिंग मिळाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Horror Thriller Web Series : हादरवणारा क्लायमॅक्स, प्रत्येक एपिसोड धडकी भरवणारा, 'ही' हॉरर -थ्रिलर वेबसीरिज पाहिलीत!