Javed Akhtar-Shabana Azmi : प्रिटी लिटील बेबी....! शबानाची पच्चांहत्तरी, रोमँटिक झाले जावेद अख्तर! VIDEO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Javed Akhtar-Shabana Azmi Dance : शबाना आजमी यांनी मोठ्या थाटात बॉलिवूडकरांच्या उपस्थितीत आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी जावेद अख्तर आणि शबाना यांच्या रोमँटिक डान्सने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.
Javed Akhtar-Shabana Azmi Dance : शबाना आजमी या हिंदी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. नुकतचं बॉलिवूडकरांच्या उपस्थितीत त्यांनी शाही थाटात आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. शबाना आजमी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता बोनी कपूर यांनी त्यांच्या साठी एक भव्य पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीत रेखा, उर्मिला मातोंडकर, माधुरी दीक्षित, मनीष मल्होत्रा, अनिल कपूर आणि करण जौहरसारखे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यावेळी शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांनी रोमँटिक डान्सदेखील केला. त्यांच्या डान्सने उपस्थितीत सर्वांची मने जिंकली.
75 वर्षांच्या झाल्या शबाना आजमी!
अबाना आजमींच्या वाढदिवशी बॉलिवूडकरांनी आपल्या उपस्थितीने या बर्थडे पार्टीला चार चांद लावले. शबाना आजमी गेली अनेक दशके आपल्या साधेपणामुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेकांसोबत त्यांनी आजवर काम केलं आहे. कदाचित याच कारणामुळे 18 सप्टेंबर रोजी बोनी कपूर यांनी त्यांच्या सन्मानार्थ एका भव्य पार्चेटी आयोजन केले होते.
advertisement
शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांच्या रोमँटिक डान्सने वेधलं लक्ष
शबाना आजमी आपल्या वाढदिवशी पती जावेद अख्तर यांच्यासोबत रोमँटिक डान्स करताना दिसून आल्या. शबाना आजमी आणि जावेद अख्तर त्यांच्या परफॉर्मन्सने संपूर्ण माहोल रंगतदार केला. माधुरी दीक्षित, फराह खान, मनीष मल्होत्रा, रेखा, महीप कपूर आणि करण जौहर हे सेलिब्रिटी यावेळी या जोडप्याला चिअर करताना दिसले. उपस्थित असलेल्या सर्व सेलिब्रिटींनी आपल्या कॅमेऱ्यात हे क्षण टिपले.
advertisement
advertisement
फरहान अख्तरदेखील आपल्या आई-वडिलांचा रोमँटिक डान्स एन्जॉय करताना दिसून आला. आपल्या फोनमध्ये त्याने हे क्षण कैद केले. एकंदरीतच उपस्थित असलेल्या सर्व सेलिब्रिटींच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव पाहण्यासारखे होते. फराह खानने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"
देव करो की तुम्ही दोघं नेहमी असेच तरुण राहा". चाहते जावेद अख्तर आणि शबाना आजमी यांच्यावर भरभरून प्रेम करत आहेत.
advertisement
रेखा-माधुरीच्या डान्सने वेधलं लक्ष
शबाना आजमींच्या वाढदिवसानिमित्त रेखा, माधुरी दीक्षित, विद्या बालन आणि उर्मिला यांनी त्यांच्यासोबत मनसोक्त डान्स केला. त्यांचेही डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 10:21 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Javed Akhtar-Shabana Azmi : प्रिटी लिटील बेबी....! शबानाची पच्चांहत्तरी, रोमँटिक झाले जावेद अख्तर! VIDEO