Solapur- Mumbai Air Service : सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून होणार सुरू, पहिलं उड्डाणही ठरलं?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
Solapur- Mumbai Air Service : बहुप्रतीक्षित सोलापूर- मुंबई विमान सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाकडून सोलापूरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर त्या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे.
बहुप्रतीक्षित सोलापूर- मुंबई विमान सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. केंद्रीय नागरी वाहतूक मंत्रालयाकडून सोलापूरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर त्या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 15 ऑक्टोबरपासून सोलापूर- मुंबई विमान सेवेला सुरूवात होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता अखेर त्या चर्चांना पुर्णविराम मिळाला असून सोलापूर- मुंबई विमान सेवेचा मुहूर्त मिळाला आहे. सोलापूर- मुंबई विमान सेवा केव्हापासून सुरू होणार याबद्दलची माहिती स्वत: केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्र्यांनी दिली आहे.
सोलापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर पूर्ण होणार आहे. सोलापूर- मुंबई विमान सेवा सोलापूरकरांच्या सेवेमध्ये 15 ऑक्टोबरपासून येणार आहे. सोलापूर- मुंबई विमान सेवेसोबतच सोलापूर- बंगळूरू विमान सेवा सुद्धा सुरू होणार आहे. बहुप्रतीक्षित विमानसेवेबद्दलची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सोलापूरकरांना दिली आहे. 15 ऑक्टोबरपासून दुपारी 12:55 मिनिटांनी सोलापूर- मुंबई आणि दुपारी 02:45 मिनिटांनी मुंबई- सोलापूर विमानसेवेला सुरूवात होणार आहे.
advertisement
तर सकाळी 11:10 मिनिटांनी बंगळूरू- सोलापूर आणि दुपारी 04:15 मिनिटांनी सोलापूर-बंगळूरू विमानसेवेला सुरूवात होणार आहे. या दोन्ही शहरातल्या विमानसेवेच्या प्री- तिकिट बुकिंगसाठी 20 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोलापूर-गोवा विमानसेवा सुरु झालीय, ज्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. त्यानंतर आता मुंबई आणि बंगळूरूसाठी देखील विमानसेवा सुरु होत असल्याने सोलापूरकरामध्ये आनंद निर्माण झाला आहे. सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींची दीर्घकाळापासून प्रलिंबित राहिलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Sep 19, 2025 5:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur- Mumbai Air Service : सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून होणार सुरू, पहिलं उड्डाणही ठरलं?










