Tata Memorial Hospital Bharati : टाटा मेमोरियल रूग्णालयात नोकरीची संधी, थेट मुलाखतीतून होणार निवड प्रक्रिया

Last Updated:

Tata Memorial Hospital Bharati 2025 : कॅन्सर रूग्णांसाठी मुंबईच्या टाटा रूग्णालयाची संपूर्ण देशामध्ये ओळख आहे. या रूग्णालयामध्ये देशातल्या कानाकोपऱ्यातून कॅन्सरच्या उपचारासाठी पेशंट येत असतात. कायमच लोकांमध्ये चर्चेत राहणाऱ्या ह्या हॉस्पिटलमध्ये आता नोकरीची संधी आहे.

News18
News18
कॅन्सर रूग्णांसाठी मुंबईच्या टाटा रूग्णालयाची संपूर्ण देशामध्ये ओळख आहे. या रूग्णालयामध्ये देशातल्या कानाकोपऱ्यातून कॅन्सरच्या उपचारासाठी पेशंट येत असतात. कायमच लोकांमध्ये चर्चेत राहणाऱ्या ह्या हॉस्पिटलमध्ये आता नोकरीची संधी आहे. 'चाचणी समन्वयक' पदासाठी नोकर भरती केली जाणार आहे. मुंबईच्या परळमध्ये असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ही थेट नोकरभरती केली जाणार आहे. या पदासाठी कोण कोणत्या शैक्षणिक पात्रता असतील आणि एकूण पदसंख्या किती असणार आहेत, जाणून घेऊया...
मुंबईमध्ये असणाऱ्या ह्या 'टाटा मेमोरियल' हॉस्पिटलमध्ये नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. 'चाचणी समन्वयक' पदासाठी ही नोकर भरती केली जाणार आहे. फक्त एकच पदासाठी ही नोकरभरती होणार आहे. अलीकडेच नोकरीबद्दलची अपडेट हाती आली आहे. 18 सप्टेंबर रोजी ही नोकर भरती जाहीर करण्यात आली आहे. 9 ऑक्टोबर 2025 रोजी थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे, याशिवाय परीक्षा सुद्धा यावेळी घेतली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी, क्लिनिकल रिसर्चमध्ये पदव्युत्तर डिप्लोमासह विज्ञान शाखेची पदवी अनिवार्य आहे. शिवाय, अर्जदाराकडे संबंधित विभागामध्ये एक वर्षाचा नोकरीचा अनुभव देखील असावा, अशी शैक्षणिक पात्रता हवी आहे.
advertisement
अर्जदाराची निवड प्रक्रिया थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. कोणताही ऑनलाईन अर्ज न भरता उमेदवाराची मुलाखत घेतली आहे. परळमधील टाटा मेमोरियल रूग्णालयामध्ये अर्जदारांची मुलाखत घेतली जाणार आहे. एचआरडी मीटिंग रूम, तिसरा मजला, मुख्य इमारत, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परळ, मुंबई – 400012 असा मुलाखतीचा पत्ता आहे. येताना अर्जदाराकडे स्वत:चा बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स आणि ओरिजनल डॉक्युमेंट, तुमचे सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र ते देखील झेरॉक्स आणि ओरिजनल डॉक्युमेंट हवे. सर्व झेरोक्स सेल्फ अटेस्टेड स्वरूपात हवे आहेत.
advertisement
जर मुलाखतीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार आले. तर, त्यांची सर्वात आधी MCQ चाचणी घेतली जाईल. त्यानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल. उमेदवारांना त्यांच्या सध्याच्या HOD किंवा प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटरकडून NOC सादर करणे आवश्यक आहे. या अशा माध्यमातून उमेदवाराची निवड प्रक्रिया होणार आहे. ज्या उमेदवाराची हॉस्पिटलमध्ये निवड होणार, त्याला मासिक वेतन 27,000 पर्यंत मिळणार आहे.
मराठी बातम्या/मुंबई/
Tata Memorial Hospital Bharati : टाटा मेमोरियल रूग्णालयात नोकरीची संधी, थेट मुलाखतीतून होणार निवड प्रक्रिया
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement