Shocking News : डॉक्टर बाहेर पडताच घरी घडलं मोठं कांड; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Last Updated:

Dombivli Doctor House Theft : डोंबिवलीतील एका डॉक्टरच्या बंद घरातून चोरट्यांनी चार लाख 50 हजारांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरले.

News18
News18
डोंबिवली : डोंबिवलीतील एका डॉक्टरच्या घरात झालेल्या घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी बंद घराचा फायदा घेत तब्बल चार लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॉक्टर अनुज विनोदकुमार गांधी यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
डॉक्टर बाहेर गेले अन् घरात अन्..
मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. डॉक्टर गांधी घराबाहेर गेले असताना चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची खात्री करून घरात प्रवेश केला. दरवाज्याचे कुलूप तोडून चोर घरात घुसले आणि थेट तिजोरीवर हात साफ केला.
चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, कर्णफुले, अंगठ्या असा मौल्यवान ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत सागंण्यात आले आहे. चोरीनंतर घरी परतल्यानंतर घरातील वस्तू अस्ताव्यस्त दिसल्याने चोरी झाल्याचे उघड झाले.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात आहे. या घटनेमुळे डोंबिवली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घर बंद ठेवताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking News : डॉक्टर बाहेर पडताच घरी घडलं मोठं कांड; डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Wilson Gymkhana: गिरगावकरांच्या हक्काच्या जागेवर आता कुंपण! विल्सन जिमखाना आता 'जैन जिमखाना, स्थानिकात संतापाची लाट
गिरगावकरांच्या हक्काच्या जागेवर आता कुंपण! विल्सन जिमखाना आता 'जैन जिमखाना, स्था
  • मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि परप्रांतीयांचा वाढणारा टक्का आदी मुद्देही चर्चेत

  • मराठी-अमराठी वादाची उजळणी सुरू असताना दुसरीकडे या वादाची तीव्रता वाढवणारी घटना स

  • विल्सन मैदानाचा ताबा आल्यानंतर त्याचे नावच जैन जिमखाना

View All
advertisement