मुंबईहून निघालेल्या इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सि लॅण्डिंग, एका ई-मेलनं उडाली खळबळ, कारण काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबईहून फुकेतला जाणाऱ्या इंडिगोच्या 6 E 1089 विमानाला बॉम्ब धमकी मिळाल्याने चेन्नईत इमर्जन्सि लॅण्डिंग, तपासणीत धमकी खोटी ठरली, प्रवाशांची सुरक्षितता जपली.
मुंबईहून फुकेतला निघालेल्या इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सि लॅण्डिंग करावं लागलं. प्रवाशांच्या मनात धडकी भरली. नक्की काय घडतंय समजत नव्हतं. अचानक गोंधळ सुरू झाला. मुंबईहून फुकेतला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. त्यामुळे चेन्नई विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. सुरक्षा तपासणीत बॉम्बसारखी कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही आणि ही धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले.
मुंबईहून फुकेतसाठी निघालेल्या इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6 E 1089 ला शुक्रवारी रात्री सुरक्षा अलर्ट मिळाल्यानंतर चेन्नई विमानतळाकडे वळवण्यात आले. विमानाचे लँडिंग होताच सीआयएसएफच्या जवानांनी त्याला सुरक्षा घेऱ्यात घेऊन तपासणी सुरू केली. अनेक तासांच्या तपासणीनंतरही बॉम्बसारखी कोणतीही वस्तू न सापडल्याने ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले.
एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, या धोक्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ संबंधित यंत्रणांना कळवले. फुकेत विमानतळावर रात्रीचा कर्फ्यू असल्यामुळे पुढील उड्डाणाला विलंब झाला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कंपनीने त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली आणि त्यांना सतत माहिती दिली जात आहे. इंडिगोने प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे.
advertisement
इंडिगोच्या या घटनेपूर्वी,14 सप्टेंबर रोजी लखनऊ ते दिल्ली जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6 E 1089 मध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून विमान परत पार्किंग बेमध्ये आणून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले. नंतर त्यांच्या प्रवासासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 20, 2025 8:56 AM IST
मराठी बातम्या/देश/
मुंबईहून निघालेल्या इंडिगोच्या विमानाचं इमर्जन्सि लॅण्डिंग, एका ई-मेलनं उडाली खळबळ, कारण काय?