सर्वसामान्यांच्या नरडीचा घोट घेणारा बिबट्या आता राजकरण्याच्या दारात, जुन्नरच्या बड्या नेत्याच्या निवासस्थानी थरार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
जुन्नर विधानसभेची निवडणूक लढलेले शरद पवारांच्या गटाचे नेत्यांच्या निवासस्थानी बिबट्या घुसला
सचिन तोडकर, प्रतिनिधी
पुणे : शेतकऱ्याच्या आणि सर्व सामान्यांच्या नरडीचा घोट घेतलेला बिबट्या आता नेत्यांच्या घरापर्यंतही जाऊन पोहोचला असल्याचं दिसतंय. जुन्नरमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी अचानक बिबट्या आला. तरस मागे लागल्याने या बिबट्याने इलेक्ट्रिक फेन्सिंगच्या भिंतीवरून प्रवेश केला. काही वेळाने हा बिबट्या बाहेरही गेला. या सगळ्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
जुन्नर विधानसभेची निवडणूक लढलेले शरद पवारांच्या गटाचे नेते सत्यशिल शेरकर यांच्या निवासस्थानी ५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजून २१ मिनिटांनी बिबट्याने त्यांच्या कंपाऊंडच्या भिंतीवर उडी मारून आत प्रवेश केला. या प्रसंगी बिबट्याच्या मागावर एक तरस असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय आहे सीसीटीव्हीमध्ये?
कंपाऊंड परिसराला इलेक्ट्रिक फेन्सिंग बसविण्यात आले असून त्यातील विद्युतप्रवाहाची तीव्रता सुमारे ९ हजार डीसी व्होल्ट इतकी आहे. इतक्या उच्च तीव्रतेचा करंट असतानाही बिबट्याला धक्का बसला नसल्याचे आढळून आले. फेन्सिंगशी संलग्न सुरक्षा यंत्रणेतील सायरनही वाजला, मात्र बिबट्याने काही वेळ बंगल्याच्या आतील परिसरातही हालचाल केल्यानंतरच येथील परिसर सोडला.
advertisement
‘शॉक मशीन’ बसविण्याचे काम सुरू
सध्या बिबट प्रवण क्षेत्रात राज्य शासनाच्या वतीने झटका देणारी ‘शॉक मशीन’ बसविण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु हे यंत्र बिबट्यावर किती प्रभावी ठरेल हे येणाऱ्या काळात दिसून येईलच, मात्र ह्या व्हिडीओने या यंत्रावर शंका उपस्थित होत असून यावर शासनाने ठोस उपाययोजना केल्या पाहिजे.
उत्तर पुणे जिल्हा बिबट्यांचा हॉटस्पॉट
advertisement
उत्तर पुणे जिल्ह्यांसह नाशिक आहिल्यानगर जिल्हात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असुन बिबट्याकडून लहान मुलांना लक्ष केलं जात असल्याने वनविभागाने जनजागृतीसाठी करत सतर्क रहाण्याचे आवाहन करत ट्रिझर लॉच केला आहे. बिबट प्रवण क्षेत्रात लहान मुलांना एकटं सोडू नका असं आवाहन करत वनविभागाकडून प्रबोधन करण्यात आलं आहे. बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावे यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील महिलांनी अनोखी शक्कल लढवत गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टा घातला आहे. बिबट्या प्रामुख्याने मानेवरती हल्ला करतो आणि असे टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं ही कल्पना डोक्यात घेऊन महिलांनी ही अनोखी शक्कल लढवलीय.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 09, 2025 9:03 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
सर्वसामान्यांच्या नरडीचा घोट घेणारा बिबट्या आता राजकरण्याच्या दारात, जुन्नरच्या बड्या नेत्याच्या निवासस्थानी थरार


