Bhavya Gandhi : 'साखरपुड्याची बातमी कळताच माझ्या आईने...', मुनमुन दत्तासोबतच्या एंगेजमेंटच्या चर्चांवर 'टप्पू' स्पष्टच बोलला

Last Updated:
TMKOC fame Bhavya Gandhi : नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेता भव्य गांधीने शोमध्ये परत येण्याची शक्यता आणि मुनमुन दत्तासोबतच्या अफेअर आणि साखरपुड्याच्या अफवांवर स्पष्ट भाष्य केले आहे.
1/8
मुंबई : टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मुळे घराघरात पोहोचलेला 'टप्पू' म्हणजे अभिनेता भव्य गांधी. २००८ ते २०१७ या काळात भव्यने 'टप्पू'ची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली.
मुंबई : टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मुळे घराघरात पोहोचलेला 'टप्पू' म्हणजे अभिनेता भव्य गांधी. २००८ ते २०१७ या काळात भव्यने 'टप्पू'ची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली.
advertisement
2/8
सध्या तो गुजराती चित्रपटांमध्ये कार्यरत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने शोमध्ये परत येण्याची शक्यता आणि मुनमुन दत्तासोबतच्या अफेअर आणि साखरपुड्याच्या अफवांवर स्पष्ट भाष्य केले आहे.
सध्या तो गुजराती चित्रपटांमध्ये कार्यरत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने शोमध्ये परत येण्याची शक्यता आणि मुनमुन दत्तासोबतच्या अफेअर आणि साखरपुड्याच्या अफवांवर स्पष्ट भाष्य केले आहे.
advertisement
3/8
भव्य गांधीने २०१७ मध्ये शो सोडल्यानंतर, त्याने पैशांमुळे शो सोडल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. अखेर भव्यने यावर मौन सोडले आहे. भव्य म्हणाला,
भव्य गांधीने २०१७ मध्ये शो सोडल्यानंतर, त्याने पैशांमुळे शो सोडल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. अखेर भव्यने यावर मौन सोडले आहे. भव्य म्हणाला, "मी कधीही पैशांसाठी काम केले नाही आणि पैशांसाठी शो सोडला नाही."
advertisement
4/8
'एका एपिसोडसाठी तो १० हजार रुपये घेत होता का?' या प्रश्नावर त्याने उत्तर दिले,
'एका एपिसोडसाठी तो १० हजार रुपये घेत होता का?' या प्रश्नावर त्याने उत्तर दिले, "नाही. शोसाठी किती पैसे मिळायचे हे मला माहीत नाही, कारण मी त्यावेळी लहान होतो. सर्व आर्थिक व्यवहार आई-वडील पाहत होते. आजपर्यंत मी त्यांना माझी फी किती होती, हे विचारले नाही."
advertisement
5/8
मार्च २०२४ मध्ये 'बबिता जी' म्हणजेच मुनमुन दत्ता आणि 'टप्पू' (राज अनादकट) यांनी गुजरातच्या वडोदरा येथे गुपचूप साखरपुडा केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. या अफवेदरम्यान, भव्य गांधीचे फोटोही मुनमुनसोबत जोडले गेले होते, ज्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

6/8
या अफवांवर प्रतिक्रिया देताना भव्य गांधीने भयंकर किस्सा सांगितला. तो म्हणाला,
या अफवांवर प्रतिक्रिया देताना भव्य गांधीने भयंकर किस्सा सांगितला. तो म्हणाला, "वडोदरामध्ये माझा साखरपुडा झाला आहे, अशी बातमी अचानक सोशल मीडियावर पसरली. त्यानंतर वडोदरा येथील एका व्यक्तीने माझ्या आईला फोन केला आणि विचारले, 'तुमच्या मुलाचा साखरपुडा झाला आहे का?'
advertisement
7/8
भव्य पुढे म्हणाला,
भव्य पुढे म्हणाला, "आईला त्या वेळी खूप राग आला. तिने त्या व्यक्तीला विचारले, 'तुम्ही काय बोलत आहात, तुम्हाला कळतंय की नाही? तुम्हाला डोकं आहे की नाही?'" भव्यने स्पष्ट केले की, या रँडम अफवा होत्या आणि यात काहीही सत्य नव्हते.
advertisement
8/8
भव्य गांधीच्या जागी आता नीतीश भलूनी 'टप्पू'ची भूमिका साकारत आहे. मुलाखतीत 'शोमध्ये परत जाणार का?' असे विचारले असता भव्य गांधीने सकारात्मक उत्तर दिले. भव्य म्हणाला,
भव्य गांधीच्या जागी आता नीतीश भलूनी 'टप्पू'ची भूमिका साकारत आहे. मुलाखतीत 'शोमध्ये परत जाणार का?' असे विचारले असता भव्य गांधीने सकारात्मक उत्तर दिले. भव्य म्हणाला, "मला नक्कीच शोमध्ये परत जायला आवडेल. मी माझ्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी तिथे जायला तयार आहे."
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement