आधी की शेवटी भाजी बनवताना मीठ कधी टाकावं? अनेक गृहिणींना हे माहित नसतं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
बऱ्याच वेळा आपण सवयीने मीठ आधीच टाकतो, तर काहीजण जेवणाच्यामध्ये किंवा शेवटी टाकतात. पण जसं चहामध्ये साखर योग्य वेळी टाकली तरच ती परफेक्ट लागते, तसंच भाजीत मीठ योग्य वेळी टाकलं तरच त्याची खरी चव खुलते.
आपण रोज जेवणात कितीही चविष्ट पदार्थ बनवले, तरी जर त्यात मीठ नसेल, तर त्या जेवणाला काहीच स्वाद राहत नाही, मग ते कितीही चांगलं जेवण असलं तरी देखील मीठाशिवाय चवदार लागणार नाही. पण तुम्हाला माहितीय का की फक्त मीठ टाकणं पुरेसं नसतं; ते कधी आणि कसं टाकायचं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा आपण सवयीने मीठ आधीच टाकतो, तर काहीजण जेवणाच्यामध्ये किंवा शेवटी टाकतात. पण जसं चहामध्ये साखर योग्य वेळी टाकली तरच ती परफेक्ट लागते, तसंच भाजीत मीठ योग्य वेळी टाकलं तरच त्याची खरी चव खुलते.
advertisement
advertisement
सुकी भाजी करताना मीठ कधी टाकावं?जर तुम्ही सुकी भाजी (जसे की बटाटा, कोबी, टोमॅटो इ.) करत असाल, तर सुरुवातीलाच मीठ घालावं. यामुळे भाज्यांचं कच्चेपण निघून जातं आणि त्या लवकर शिजतात. मात्र काही भाज्या जशा की भेंडी, गाजर किंवा कारले, यांना शेवटी मीठ टाकणं चांगलं असतं. त्यामुळे त्यांचा क्रंच आणि नैसर्गिक चव टिकून राहतो.
advertisement
हिवाळ्यात पालेभाज्या पालक, मेथी, सरसोंचा साग मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. पण या भाज्या करताना एक गोष्ट लक्षात ठेवा: शिजवताना मीठ टाकू नका. कारण त्याने पालेभाज्यांचा हिरवा रंग काळसर होतो आणि त्यांचा पौष्टिकपणा कमी होतो. या भाज्या जेव्हा सर्व्ह करणार असाल, तेव्हा शेवटी आपल्या चवीप्रमाणे मीठ घाला. त्यामुळे रंग आणि पोषण दोन्ही टिकून राहतं.
advertisement
advertisement
डाळ करताना मीठ कधी टाकावं?बर्‍याच लोकांचा एक सर्वसाधारण गैरसमज आहे की, डाळ शिजवतानाच मीठ घालावं. पण हे चुकीचं आहे. कारण डाळीत प्रोटीन असतं आणि सुरुवातीला मीठ घातल्यास ती घट्ट होते आणि लवकर शिजत नाही. त्यामुळे डाळीला शिजू द्या आणि शेवटी, फोडणी देताना किंवा शेवटच्या टप्प्यात मीठ घाला. यामुळे डाळ चांगली मऊ होते आणि तिचा स्वाद टिकून राहतो.
advertisement


