MCA निवडणूकीत ठाकरेंच्या आमदाराची एन्ट्री, CM फडणवीसांचा फोटो लावून प्रचार, रंगत वाढली

Last Updated:

मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या शर्यतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उडी घेतली आहे. ते देखील अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या शर्यतीत आहे.

mca election
mca election
Mumbai Cricket Assocition Election : मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या शर्यतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उडी घेतली आहे. ते देखील अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या शर्यतीत आहे. यासाठी मिलिंद नार्वेकर यांनी प्रचार सूरू केला आहे.या प्रचारात त्यांनी डिजीटल बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा फोटो वापरल्याने सगळ्यांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. तसेच यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 12 नोव्हेंबर 2025 ला होणार आहेत. या पदासाठी सहा जण इच्छुक असल्याची माहिती आहे. विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर, भाजप नेते प्रसाद लाड, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जिंतेंद्र आव्हाड, आणि प्रताप सरनाईक यांचे पूत्र विहंग सरनाईक इच्छुक आहेत. तसेच या निवडणुकीत माजी कर्णधार डायना एडुलजी या देखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे.
advertisement
सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे… या निवडणुकीत सर्वपक्षीय नेते उमेदवार वेगवेगळ्या पॅनलमध्ये आणि स्वतंत्रपणे उभे आहेत.या निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी चक्क मतदारांसाठी प्रसारित करण्यात आलेल्या डिजीटल बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा फोटो वापरला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया तर उंचावलेल्या आहेत.त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे.
advertisement
दरम्यान आयसीसी अध्यक्ष जय शहा, मुंबई क्रिकेट संघटनेचे स्टॉलवर्ट शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपनेते आशिष शेलार या सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले नार्वेकर मुंबई क्रिकेट संघटनेच्या प्रशासनात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मुंबई ट्वेन्टी20 लीगच्या अध्यक्षपदासह एपेक्स कॉन्सिलचे सदस्यत्वपदी त्यांनी सांभाळलेले आहे.यंदा मोठी झेप घेण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MCA निवडणूकीत ठाकरेंच्या आमदाराची एन्ट्री, CM फडणवीसांचा फोटो लावून प्रचार, रंगत वाढली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement