PNB LBO Recruitment 2025: 'पंजाब नॅशनल बँक'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी भरती अन् पगार सुद्धा घसघशीत...

Last Updated:

PNB LBO Recruitment 2025: फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रामध्ये करियर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. PNB बँकेमध्ये म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेमध्ये तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे.

PNB LBO Recruitment 2025: 'पंजाब नॅशनल बँक'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी भरती अन् पगार सुद्धा घसघशीत...
PNB LBO Recruitment 2025: 'पंजाब नॅशनल बँक'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी भरती अन् पगार सुद्धा घसघशीत...
फायनान्स आणि बँकिंग क्षेत्रामध्ये करियर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. PNB बँकेमध्ये म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेमध्ये तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत असून इच्छुक उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकणार आहेत. बँकेमध्ये अर्ज करण्यासाठी कोणकोणते शैक्षणिक पात्रता आहे, शिवाय कोणकोणत्या पदांसाठी भरती केली जाणार आहे? जाणून घेऊया...
पंजाब नॅशनल बँकेमध्ये स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदांसाठी 750 अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकणार आहेत. भरती प्रक्रियेची सुरुवात 03 नोव्हेंबरपासून झालेली आहे. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र असून, वयोमर्यादा साधारणपणे 20 ते 30 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी वयात सवलत लागू आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत जाहिरातीची PDF वाचायची आहे. आपल्या पात्रतेप्रमाणेच अर्ज भरायचा आहे. जाहिरातीची आणि ऑनलाइन अर्जाची लिंक बातमीमध्ये देण्यात येत आहे.
advertisement
पंजाब नॅशनल बँकेमध्ये स्थानिक बँक अधिकारी पदासाठी वेतन अंदाजे 48,480 ते 85,920 रुपये प्रति महिना JMGS-I नुसार असेल. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, स्क्रीनिंग, भाषा चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश असेल. अर्ज शुल्क SC/ST/PwBD उमेदवारांसाठी अंदाजे 59 रुपये (GST सह) आहे आणि इतर उमेदवारांसाठी हे शुल्क अंदाजे 1180 रुपये (GST सह) आहे. अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे आणि ती पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे केली जाईल.
advertisement
अर्ज करण्याच्या पायऱ्या खालीलप्रमाणे
  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या- https://pnb.bank.in/Home.aspx
  • भरती/ करिअर विभागात जा आणि PNB LBO Recruitment 2025 वर क्लिक करा.
  • सूचना वाचा आणि 'Apply Online' वर क्लिक करा.
  • तुमचा ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा.
  • अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • शुल्क भरा आणि पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
PNB LBO Recruitment 2025: 'पंजाब नॅशनल बँक'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी भरती अन् पगार सुद्धा घसघशीत...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement