उद्धव ठाकरेंनी पैलवान चंद्रहार पाटलांसोबत गद्दारी केली, ३६५ दिवसांनी शिंदेंच्या हुकमी एक्क्याने सगळं बाहेर काढलं

Last Updated:

चंद्रहार पाटलांना राज्यसभेवर वाजत-गाजत घेऊन जाऊया, असं वक्तव्य करत शहाजीबापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

News18
News18
सांगली :  लोकसभा निवडणुकीला पैलवान चंद्रहार पाटलांना शिवसेना ठाकरे गटांनी फसवलं असा गंभीर आरोप माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी चंद्रहार पाटलांना निवडणुकीत उभं केलं आणि विशाल पाटलांना निवडून आणत गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेने चंद्रावर पाटलांना फसवलं असं शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले. ते सांगलीच्या बोरगावमध्ये चंद्रहार पाटलांकडून आयोजित श्रीनाथ बैलगाडा केसरी शर्यती प्रसंगी बोलत होते.
सांगली जिल्ह्यात नुकत्याच आयोजित बैलगाडा शर्यतीच्या भव्य सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आयोजक चंद्रहार पाटील यांचे विशेष कौतुक केले. शर्यतीमध्ये पहिल्यांदाच महिलांचा सहभाग झाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. शिंदे यांनी शहाजी बापू यांच्या संवादांमुळे आसामचे पर्यटन वाढल्याचा उल्लेख करत, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शहाजी बापूंना महाराष्ट्राचे पर्यटन ब्रँड अँबॅसिडर करण्याची मागणी केली.
advertisement

शहाजीबापू पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका

उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी भोळ्या-भाबड्या चंद्रहार दादाला फसवलं, त्यांना निवडणुकीला उभा केलं आणि विशाल पाटलांना निवडून दिलं... आता चंद्रहार पाटलांना राज्यसभेवर वाजत-गाजत घेऊन जाऊया, असं वक्तव्य करत शहाजीबापू पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

चंद्राहार पैलवान जरी असला तरी तो ऊसासारखा गोड : एकनाथ शिंदे

advertisement
आमच्या पैलवान गड्याचा नाद नाही करायचा, नाद केला तर एकच फाइट वातावरण टाइट.. असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रहार पाटलांचं कौतुक केलं. चंद्राहार पैलवान जरी असला तरी तो ऊसासारखा गोड आहे. रक्तदान शिबिर, गोवंश संरक्षण असे विविध सामाजिक उपक्रम चंद्रहार पाटील राबवतात. गोवंशाच रक्षण करण्यासाठी चंद्रहार आखाड्यात उतरला आहे. चंद्रहार "तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, गोमातेला राज्य मातेचे दर्जा देण्याचं काम आम्ही केलं, असेही एकनाथ शिंदे म्हणाला.
advertisement

लोकसभा निवडणुकीवेळी काय घडलं?

सांगली मतदारसंघावरून लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीत बरीच रस्सीखेच झाली होती. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढवत असल्याचा शिवसेनेचा दावा होता. तर वाटाघाटीत असं ठरलं नसल्याचं म्हणत काँग्रेस नेत्यांकडून वारंवार सांगण्यात आलं. काँग्रेसनं अखेरपर्यंत शिवसेनेकडून हा मतदारसंघ मिळवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेनेनं ऐकलं नाही त्यामुळं अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती.
advertisement
लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मागून घेतलेल्या या मतदारसंघात त्यांचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचं डिपॉझिट जप्त झालं होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उद्धव ठाकरेंनी पैलवान चंद्रहार पाटलांसोबत गद्दारी केली, ३६५ दिवसांनी शिंदेंच्या हुकमी एक्क्याने सगळं बाहेर काढलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement