विरारकरांचा प्रवास होणार सुसाट,गेम चेंजर ठरणार 24 किमी 'हा' मार्ग; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
विरार ते अलिबाग मल्टीमॉर्डन कॉारिडॉर तयार केला जाणार आहे. या भागातील प्रवास भविष्यात वेगवान होणार आहे.
मुंबई : मुंबईत पायाभूत विकासाची काम वेगानं सुरू आहेत. मुंबई आणि परिसरात नागरिकांचा प्रवास वेगानं व्हावा यासाठी अनेक प्रकल्प सरकारनं हाती घेतले आहे. मुंबईच्या वेगाला आणखी गती देण्यासाठी आता भाईंदर - विरार या 24 किमीच्या सागरीमार्गाची निर्मिती केली जाणार आहे. तसेच विरार ते अलिबाग मल्टीमॉर्डन कॉारिडॉर तयार केला जाणार आहे. सीएनबीसी18 च्या ग्लोबल लिडरशीप समेटमध्ये बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी विकासाचं व्हिजन मांडलं आहे.
मुंबईच्या वेगाला आणखी गती देण्यासाठी आता भाईंदर - विरार या 24 किमीच्या सागरीमार्गची निर्मिती केली जाणार आहे. गेल्या काही वर्षात मुंबई आणि परिसराचा वेगानं विकास होतोय. त्यामुळं भाईंदर ते विरार या टप्पात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचसोबत विरार ते अलिबाग मल्टीमॉर्डन कॉारिडॉर
तयार केला जाणार आहे. या भागातील प्रवास भविष्यात वेगवान होणार आहे.
advertisement
मुंबईत कोणते प्रकल्प आहेत सुरु?
सीएनबीसी18 च्या ग्लोबल लिडरशीप समेटमध्ये बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी विकासाचं हे व्हिजन मांडलं आहे. मुंबईतील विविध भाग मेट्रोच्या जाळ्यांनीही जोडली जात आहे. मुंबईत अॅक्वा मेट्रो लाईनही सुरू झाली आहे.मेट्रोसोबत शिवडी न्हावाशेवा अटल सेतू सोबत कोस्टल रोडही सि लिंकसोबत जोडला गेला आहे. तर वांद्रे-वर्सोवा सी-लिंकचं काम सुरू आहे...
advertisement
मुंबई लागून असलेल्या शहरातील नागरिकांचा प्रवास सुसाट
मुंबई आणि एमएमआर रिजनमुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे.एकूणच मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये सुरू असलेल्या विकास कामांमुळं भविष्यात मुंबईकरांसोबत
मुंबई लागून असलेल्या शहरातील नागरिकांचा प्रवास सुसाट होणार आहे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 8:47 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
विरारकरांचा प्रवास होणार सुसाट,गेम चेंजर ठरणार 24 किमी 'हा' मार्ग; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा


