अलिकडच्या भागात स्पर्धक पल्लवी निफाडकर हॉट सीटवर आली होत्या. तिने तिच्या मुलींना शोमध्ये आणण्याची इच्छा व्यक्त केली आणि बिग बींनी त्यांचे मनापासून स्वागत केले. या वेळी पल्लवीच्या धाकट्या मुलीने पारंपरिक पोशाख परिधान केला होता आणि केसात मोगऱ्याची माळ घातली होती. अमिताभ यांनी तिचं कौतुक केलं आणि लगेचच पत्नी जया बच्चन यांची आठवण काढली. त्यांनी सांगितले की, “जयालाही मोगऱ्याच्या माळा घालायला खूप आवडतात.”
advertisement
जया बच्चनचा जाच की अभिषेकसोबत भांडण? ऐश्वर्या सासर सोडून आईकडे का राहते, अखेर समोर आलं सत्य
यावेळी एक किस्सा सांगताना बिग बींनी खुलासा केला की, कधी काळी जया बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट केला होता आणि त्या वेळी ते स्पर्धकाच्या खुर्चीवर बसले होते. अमिताभ हसत म्हणाले, “त्या वेळी मीच अवाक झालो होतो. जया माझ्यासमोर बसली होती आणि मी घाबरलो. तिने मला जोरात एक कानशिलात दिली होती.” त्यांच्या या किस्स्यावर संपूर्ण सेटवर हशा पिकला.
अमिताभ आणि जया बच्चन यांचं लग्न 3 जून 1973 रोजी झालं होतं. हे लग्न खूप साधेपणाने आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन. आजही या दाम्पत्याची जोडी इंडस्ट्रीत आदर्श मानली जाते. अमिताभ बच्चन केबीसीमध्ये नेहमीच अशा छोट्या आठवणी शेअर करतात. त्यामुळे प्रेक्षकांना केवळ खेळाची मजा नाही तर त्यांच्या आयुष्याचे अनोखे किस्सेही ऐकायला मिळतात.