TRENDING:

VIDEO: अक्षय कुमारसह अमृता फडणवीसांचं Clean Up, पोहोचले जुहू चौपाटीवर

Last Updated:

Amruta Fadnavis:गणेशोत्सवानंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड प्रमाणात कचरा, निर्माल्य आणि सजावटीचे साहित्य जमा झाले. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही ही समस्या गंभीर झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गणेशोत्सवानंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड प्रमाणात कचरा, निर्माल्य आणि सजावटीचे साहित्य जमा झाले. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही ही समस्या गंभीर झाली. मात्र यंदा या कचऱ्याची साफसफाई करण्यासाठी बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी स्वतः पुढे सरसावले.
अक्षय कुमारसह अमृता फडणवीसांचं Clean Up,
अक्षय कुमारसह अमृता फडणवीसांचं Clean Up,
advertisement

7 सप्टेंबर रोजी जुहू चौपाटीवर या तिघांनी समुद्रकिनाऱ्यावर पडलेला कचरा स्वतः हाताने उचलला. फडणवीस यांची लहान मुलगीही या उपक्रमात सहभागी झाली. समाजात स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण व्हावी, हा उद्देश त्यांच्या मागे होता. अक्षय कुमारने साफसफाईदरम्यान सांगितले, "स्वच्छता ही केवळ बीएमसी किंवा सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाची आहे. आपण सर्वजण मिळूनच शहर स्वच्छ ठेवू शकतो."

advertisement

सेट बघायला आले अन् दिली थेट लीड रोलची ऑफर, न्यूज चॅनलची इंटर्न कशी बनली प्रसिद्ध अभिनेत्री?

यावेळी अनेक स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनीही हजेरी लावली. जवळपास 50 हून अधिक पिशव्या कचऱ्याने भरल्या गेल्या. निर्माल्य वेगळं गोळा करून पुढे खत निर्मितीसाठी देण्यात आलं.

या उपक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहेत. अनेकांनी अक्षय आणि अमृताचे कौतुक केले. मात्र काहींनी "कॅमेरा बंद म्हणजे सफाई बंद", "सगळं नाटक आहे" अशा कमेंट्स करत ट्रोलही केले.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
VIDEO: अक्षय कुमारसह अमृता फडणवीसांचं Clean Up, पोहोचले जुहू चौपाटीवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल