महेश कोठारेंनी धडाकेबाज स्टाइलने केलं कौतुक
'धडाकेबाज' दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या कामाच्या शैलीची प्रशंसा करत केली. कोठारे म्हणाले, "धडाकेबाज आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि झपाटलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथकरांना खरोखरच एक 'रत्न' भेट दिलं आहे. या शहराला नाट्यकलेचं इतकं भव्य स्थान मिळालं, याबद्दल आम्ही सगळे कलाकार खूप खूश आहोत."
advertisement
शोलेमधील जेलरची भूमिका अजरामर करणाऱ्या असरानी यांचे निधन, 84 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड
त्यांनी यावेळी अमेरिकेतील एका खास आठवणीला उजाळा दिला. "मी अमेरिकेतील 'टाईम्स स्क्वेअर' परिसरातील 'लिरिक्स थिएटर'मध्ये 'हॅरी पॉटर'चा शो पाहिला. तिथल्या नाट्यगृहात त्यांच्या कलाकारांचे पोट्रेट लावले होते. तसंच काहीसं दृश्य मला इथेही पाहून खूप आनंद झाला. कलाकाराला असं स्थान देणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. शिंदे साहेब जे काही करतात, ते 'धडाकेबाजच' करतात! असा उद्घाटन समारंभ मी कधीच पाहिलेला नव्हता."
अशोक सराफ यांनीही गायली स्तुतीसुमने
मराठी रंगभूमीचे लाडके कलाकार अशोक सराफ यांनी त्यांच्या खास विनोदी शैलीत प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यांनी या नाट्यमंदिराला 'या शहराची शान' असे म्हटले. ते म्हणाले, "अंबरनाथचं हे नाट्यमंदिर म्हणजे या शहराची शान आहे. जसं तुम्हाला शिवमंदिराबद्दल आदर आहे, तसाच या नाट्यमंदिराबद्दलही आदर ठेवा. महाराष्ट्रात इतकं भव्य नाट्यमंदिर दुर्मिळ आहे."
त्यांनी नाट्यगृहाच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला. "इतर ठिकाणी नाट्यगृहांमध्ये स्वच्छतेचा प्रश्न असतोच, पण मला खात्री आहे की अंबरनाथचे सुसंस्कृत आणि कलाप्रेमी नागरिक हे नाट्यमंदिर स्वच्छ ठेवतील. हे आपलं घर आहे, त्याची काळजी आपणच घ्यायची."
अशोक सराफ यांनी मराठी भाषेतील अनुस्वाराचे महत्त्व सांगताना एक गमतीशीर उदाहरण दिले, "अनुस्वार हा जणू गंधासारखा आहे. तो नीट दिला नाही, तर शब्दाचा अर्थच बदलतो. 'रग' वर अनुस्वार दिला की 'रंग' होतो!" शेवटी त्यांनी एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक वेळी दिलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.