मॉर्गन स्टॅन्लेचे सीईओ टेड पिक, डिस्नेचे सीईओ बॉब इगर, ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक, ॲडनॉकचे सीईओ सुल्तान अहमद अल जाबेर आणि ईएल रॉथस्चाइल्ड चेअर लिन फॉरेस्टर डी रॉथस्चाइल्ड यांच्यासह अनेक दिग्गज बिझनेसमन या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.
Article 370 नं पहिल्याच दिवशी मोडला 'द कश्मीर फाइल्स' चा रेकॉर्ड; बॉक्स ऑफिसवर केली बंपर कमाई
advertisement
सौदी अरामकोचे अध्यक्ष यासिर अल रुमायान, एनव्ही इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक व्हिवी निवो, हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी डीन नितीन नोहरिया, सीसीआरएम न्यूयॉर्कचे संस्थापक भागीदार डॉ. ब्रायन लेव्हिन, सोनीचे सीईओ केनिचिरो योशिदा, केकेआर अँड कंपनीचे सीईओ जो बे, ब्रुकफील्ड अॅसेट मॅनेजमेंटचे अध्यक्ष मार्क कार्नी, मुबादलाचे सीईओ आणि एमडी खालदून अल मुबारक, एचएसबीसी होल्डिंग्स पीएलसीचे ग्रुप चेअरमन मार्क टकर, ब्रुकफील्डचे व्यवस्थापकीय भागीदार अनुज रंजन, जनरल अटलांटिकचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बिल फोर्ड, गुंतवणूकदार कार्लोस स्लिम, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे कार्यकारी अध्यक्ष जे ली, ओकट्री कॅपिटल मॅनेजमेंटचे सह-संस्थापक हॉवर्ड मार्क्स, यॉर्क कॅपिटल मॅनेजमेंटचे संस्थापक जेम्स दिनान आणि हिल्टन आणि हायलँडचे अध्यक्ष रिचर्ड हिल्टन हेदेखील या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये देशी-विदेशी पाहुण्यांना भारतातली समृद्ध संस्कृती आणि वारशाचा आनंद घेता येईल. आलेल्या पाहुण्यांना गुजरातमधल्या कच्छ आणि लालपूर इथल्या महिला कारागिरांनी बनवलेले पारंपरिक स्कार्फ भेट म्हणून दिले जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच, अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शन निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पत्रिकेतला काही भाग असा - '1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत जामनगरमधल्या रिलायन्स ग्रीन्समध्ये राधिका आणि अनंतचं प्री-वेडिंग फंक्शन होणार आहे. त्यासाठी तुम्हाला आमंत्रित करण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे. रिलायन्सने 1997 मध्ये जामनगरजवळ जगातलं सर्वांत मोठं ग्रासरूट रिफायनिंग कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे. तेव्हापासून आतापर्यंत तिथल्या ओसाड प्रदेशात 10 दशलक्षहून अधिक झाडं लावली गेली आहेत. या ठिकाणी विविध फुलं आणि फळांच्या बागा आहेत. शिवाय याच ठिकाणी आशियातली सर्वांत मोठी आंब्याची बाग आहे. या ठिकाणी रेस्क्यू केलेल्या हजारो प्राण्यांची सोय अनंतने केली आहे. त्याने या कॉम्प्लेक्सला काळजी आणि करुणेचं आश्रयस्थान बनवलेलं आहे.'
19 जानेवारी 2023 रोजी मुंबईत अनंत आणि राधिकाचा गोलधना कार्यक्रम पार पडला. धणे आणि गूळ असा या गोल धनाचा शब्दश: अर्थ होतो. गोलधना कार्यक्रम म्हणजे गुजराती लग्नसमारंभापूर्वीची एंगेजमेंट. त्यात पाहुण्यांना गूळ आणि धणे वाटण्याचा कार्यक्रम केला जातो. वधू आणि तिचं कुटुंब मिठाई व भेटवस्तू घेऊन वराच्या घरी जातं. त्यानंतर वधू-वर एकमेकांना अंगठी घालतात आणि प्रत्येक कुटुंबातल्या पाच विवाहित स्त्रियांकडून आशीर्वाद घेतात.