Article 370 नं पहिल्याच दिवशी मोडला 'द कश्मीर फाइल्स' चा रेकॉर्ड; बॉक्स ऑफिसवर केली बंपर कमाई

Last Updated:

'उरी द सर्जिकल स्ट्राईक' फेम दिग्दर्शक आदित्य धर याने चित्रपटाची निर्मिती केली असून यात यामी गौतम, प्रियामणी आणि अरुण गोविल मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटानं आता बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कोटींचा आकडा गाठलाय जाणून घ्या.

 आर्टिकल 370
आर्टिकल 370
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडच्या 'आर्टिकल 370' या सिनेमाची खूप चर्चा होती. हा सिनेमा काश्मीरमधील कलम 370 नेमकं काय होतं आणि ते कसं हटवलं गेलं या सत्य घटनेवर आधारित आहे. अगदी पंतप्रधान मोदींनी देखील हा चित्रपट पाहण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं होतं. त्यानंतर अखेर काल २३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट रिलीज झाला आहे.'उरी द सर्जिकल स्ट्राईक' फेम दिग्दर्शक आदित्य धर याने चित्रपटाची निर्मिती केली असून यात यामी गौतम, प्रियामणी आणि अरुण गोविल मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटानं आता बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कोटींचा आकडा गाठलाय जाणून घ्या.
'आर्टिकल 370' गेल्या काही वर्षांत काश्मीरमधील परिस्थितीवर बनलेला हा दुसरा चित्रपट आहे. याआधी 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटानेतुफान कमाई केली होती आणि काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांकडे लक्ष वेधलं होतं. यानंतरच 'आर्टिकल 370' या सिनेमाची देखील चर्चा होती. निवडणुकीच्या आधी जाणूनबुजून हा सिनेमा रिलीज केला असून तो एक प्रपोगंडा चित्रपट असल्याचाही आरोप आदित्य धरवर झाला. पण असं असलं तरी प्रेक्षक या सिनेमाला उदंड प्रतिसाद देताना पाहायला मिळतंय. अनेक थिएटर्स हाऊसफुल्ल झाले आहेत. पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे.
advertisement
'आर्टिकल 370' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 5 कोटींची कमाई केली आहे. मात्र, हे केवळ चित्रपटाचे अंदाजे आकडे आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटानं 'द काश्मीर फाइल्स'च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला आहे. काश्मीर फाइल्सने पहिल्या दिवशी ३.५५ कोटींची कमाई केली होती. त्या तुलनेत या सिनेमानं अधिक कमाई केली आहे.
advertisement
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'आर्टिकल 370' चं एकूण बजेट फक्त 20 कोटी रुपये आहे. त्यामुळेच पहिल्या दिवसाची कमाई पाहता सिनेमा हा आकडा लवकरच पार करेल असं बोललं जातंय.
advertisement
'आर्टिकल 370' या सिनेमात यामी गौतम महत्त्वाच्या भूमिकेत असून तिने एका इंटेलिजन्स ऑफिसरची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, सद्य परिस्थती आणि त्यानंतर हे कलम हटवण्याचा निर्णय का घेतला गेला याभोवती फिरते. चित्रपटात यामी गौतम दहशतवाद्यांशी सामना करण्याची जबाबदारी घेते आणि त्यांचा खात्मा करते. यामी गौतम व्यतिरिक्त या चित्रपटात प्रियमणी, किरण करमरकर आणि अरुण गोविल या कलाकारांचाही समावेश आहे. रामायण फेम अरुण गोविल यांनी या सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे तर किरण करमरकर हे अमित शहांच्या भूमिकेत दिसले आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Article 370 नं पहिल्याच दिवशी मोडला 'द कश्मीर फाइल्स' चा रेकॉर्ड; बॉक्स ऑफिसवर केली बंपर कमाई
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement