दीपा आणि अंकुश लग्नाआधी 10 वर्ष एकमेकांना डेट करत होते. 2007मध्ये अंकुश आणि दीपा यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आता 15 वर्ष झालीत. दोघांना एक गोंडस मुलगा देखील आहे. या त्रिकोणी कुटुंबाचा गुण्यागोविंदानं संसार सुरू आहे. पण बायकोबरोबर रोमँटिक क्षण घालवण्यात अंकुश कधी मागे नसतो. दोघांची लव्ह स्टोरी इंडस्ट्रेटिंग आहे.
advertisement
अंकुश आणि दीपा ज्या ठिकाणी भेटले त्या ठिकाणाला दोघांनी नुकतीच भेट दिली. तिथे जाताच त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या ठिकाणी जाताच दोघांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सगळं काही सांगून जातोय. दीपा आणि अंकुश परळ या भागात लहानाचे मोठे झाले. परळमधील महर्षी दयानंद महाविद्यालयात (एमडी कॉलेज) त्यांचं शिक्षण झालं आणि याच महाविद्यालयात दोघांच्या प्रेमाची रेशीमगाठ जुळून आली. त्यामुळे हे महाविद्यालय आणि तिथली जागा त्यांच्यासाठी खूप खास आहे.
अनेक वर्षांनी दीपा आणि अंकुश महाविद्यालयात गेले होते. तिथे ज्या ठिकाणी ते सर्वाधिक वेळ घालवायचे त्या जागेवर बसून त्यांनी एक खास व्हिडीओ शेअर केलाय. "आम्ही एमडी कॉलेजला आलोय, खूप वर्षांनंतर. 1993ला आम्ही इथे शिकायला होतो.ही ती जागा, हा तो कट्टा. याच कट्ट्यावर आम्ही टाईमपास करत बसलेलो असायचो. खूप छान वाटतंय", असं अंकुश आणि दीपा या व्हिडीओमध्ये सांगत आहेत. "College Days! जुन्या आठवणींना उजाळा..!" असं कॅप्शन दोघांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
एमडी कॉलेजमध्ये नाटक-एकांकिका करत असताना दीपा आणि अंकुश यांची मैत्री झाली आणि पुढे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. कॉलेजमध्ये दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम देखील केलं. कॉलेजपासून पुढची 10 वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. 2006 साली त्यांनी साखरपुडा केला आणि 2007मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले.