घरी परतल्यानंतर अरबाज आणि शूरा यांनी त्यांच्या मुलीचं नावाची घोषणा केली. त्यांच्या मुलीचं नाव आहे ‘सिपारा खान’. त्यांनी एक गोंडस फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलं, “स्वागत आहे बाळ मुलगी सिपारा खान, अरबाज आणि शूरा यांचे प्रेम.” शूरा खानने त्यावर 'अलहमदुलिल्लाह' असं लिहिलं.
अरबाज खानच्या 'बेबी'ची पहिली झलक, मिठीत घेऊन आला हॉस्पिटलबाहेर; VIDEO व्हायरल
advertisement
‘सिपारा’ या नावामागे एक खास अर्थ दडलेला आहे. ‘सिपारा’ हा पर्शियन शब्द असून तो कुराणातील 30 अध्यायांपैकी एकाचा संदर्भ देतो. मुस्लिम धर्मात हे नाव अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक मानलं जातं. त्यामुळे या दांपत्याने त्यांच्या मुलीसाठी अर्थपूर्ण आणि धार्मिक नाव निवडल्याबद्दल चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एका फॅनने लिहिलं, “किती सुंदर नाव आणि अर्थपूर्ण देखील!” तर दुसऱ्याने म्हटलं, “माशाल्लाह, तुमच्या बाळीला उत्तम आयुष्य लाभो.” फक्त चाहतेच नव्हे तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या कपलवर प्रेमाचा वर्षाव केला. राशा थडानी, जन्नत जुबैर, सबा इब्राहिम, मंदाना करीमी, महीप कपूर यांसारख्या अनेक स्टार्सनी कमेंट सेक्शनमध्ये शुभेच्छा दिल्या.