Arbaaz Khan Baby Girl: अरबाज खानच्या 'बेबी'ची पहिली झलक, मिठीत घेऊन आला हॉस्पिटलबाहेर; VIDEO व्हायरल
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Arbaaz Khan Baby Girl: बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. 5 ऑक्टोबर रोजी या दांपत्याने त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खान यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. 5 ऑक्टोबर रोजी या दांपत्याने त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये शूराने गोंडस बाळाला जन्म दिला. काही दिवसांनंतर शूराला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि या वेळी अरबाज आणि शूरा दोघेही त्यांच्या नवजात मुलीसह बाहेर पडताना दिसले.
सोशल मीडियावर या क्षणाचा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अरबाज खान आपल्या मुलीला हातात घेऊन रुग्णालयाबाहेर निघताना दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. पापाराझींनी त्याचे स्वागत करताच अरबाजने हसत मान हलवून त्यांचे आभार मानले. त्याचवेळी शूरा मास्क घालून शांतपणे कारमध्ये बसताना दिसली.
advertisement
मुलीच्या जन्मानंतर खान कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. सलमान खानही 6 ऑक्टोबर रोजी बाळाला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचला होता. त्याच्याही भेटीचा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेत आला.
advertisement
दरम्यान, अरबाज आणि शूराने डिसेंबर 2023 मध्ये खाजगी समारंभात लग्न केले होते. लग्नानंतर त्यांनी शूराच्या गरोदरपणाची बातमी पूर्णपणे गुप्त ठेवली. काही आठवड्यांपूर्वी अरबाजने दिल्ली टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत या बातमीचा दुजोरा दिला होता. आता त्यांच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 5:48 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Arbaaz Khan Baby Girl: अरबाज खानच्या 'बेबी'ची पहिली झलक, मिठीत घेऊन आला हॉस्पिटलबाहेर; VIDEO व्हायरल