Aryan Khan Drug Case : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान जेव्हा ड्रग्ज प्रकरणात अडकला, तेव्हा त्यांच्या कुटुंबासाठी तो काळ खूप कठीण होता. प्रत्येकाला माहीत आहे की, आर्यनची सुटका करून घेण्यासाठी शाहरुखने आपले पूर्ण प्रयत्न केले होते. आता आर्यनची बाजू मांडणारे माजी अटॉर्नी जनरल आणि सीनियर अॅडव्होकेट यांनी सांगितले की, शाहरुखने त्यांना कसे मनावले. त्यांना इंग्लंडहून बोलवण्यासाठी प्रायव्हेट जेट पर्यंतची ऑफर देण्यात आली होती.
advertisement
सामान्य जामीनाची केस
माजी अटॉर्नी जनरल सीनियर अॅडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, शाहरुखने त्यांना ही केस कशी दिली. त्यांनी सांगितले की हे सामान्य जामीनाचं प्रकरण होतं, पण मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा सहभाग असल्याने केसने सगळ्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले,“मी यूकेमध्ये सुट्टीवर होतो. कोरोनाकाळ होता. मला किंग खानच्या एका जवळच्या व्यक्तीचा फोन आला की मी मुंबई उच्च न्यायालयात त्याच्यावतीने लढावं. मी नकार दिला कारण मी माझ्या सुट्ट्या खराब करू इच्छित नव्हतो.”
ना अॅक्शन, ना सस्पेन्स तरी भावते हृदयस्पर्षी कथा; OTT वरचा 'हा' 2 तास 31 मिनिटांचा सुपरहिट चित्रपट पाहिलाय का?
शाहरुखची पत्नीसोबत चर्चा
मुकुल यांनी पुढे सांगितले, "शाहरुख खानने कसाबसा माझा नंबर मिळवला आणि त्याने मला फोन केला. मी त्यालाही तेच सांगितलं. तो एक उत्तम कलाकार आहे आणि त्याने मला विचारलं की, 'मी तुमच्या पत्नीशी बोलू शकतो का?'"
पत्नीने न्यायाधीशाला मनावले
मुकुल यांनी सांगितले की शाहरुखने माझ्या पत्नीला विनंती केली की, ही केस क्लायंटसारखा नका घेऊ. किंग खान म्हणालेला, "मी एक पिता आहे." मुकुल म्हणाले की,"शाहरुख खूप भावनिक झालेला. त्यामुळे माझ्या पत्नीने केस स्वीकारण्यास मान्यता दिली.
शाहरुख खूप बुद्धिमान
मुकुल यांनी केस कशी तयार केली याबाबत सांगितले. ते म्हणाले, "मिस्टर खान खूप नम्र आहेत. त्यांनी मला प्रायव्हेट जेटची ऑफर दिली, पण मी नाकारली कारण मला छोटे जेट्स आवडत नाहीत. मी मुंबईला पोहोचलो. शाहरुख पण त्याच हॉटेलमध्ये होता जिथे मी राहिलो होतो. तो मला खूप भावनाप्रधान आणि बुद्धिमान वाटला. त्याने माझ्यासोबत अनेक नोट्स तयार करून ठेवल्या होत्या. आम्ही सविस्तर चर्चा केली. अखेर बेल मिळाली. मग मी माझ्या उरलेल्या सुट्ट्या घालवण्यासाठी लगेच इंग्लंडला परत गेलो."
काय होतं प्रकरण?
आर्यन खानला 2021 मध्ये कॉर्डेलिया रेव पार्टीजम्यान एनसीबीच्या छाप्यामध्ये अटक करण्यात आली होती. एनसीबी टीमचे नेतृत्व समीर वानखेडे करत होते. आर्यनच्या केसची सुरुवातीला पाहणी सतीश मानशिंदे यांनी केली होती. नंतर अॅडव्होकेट अमित देसाई त्यांची बाजू सांभाळत होते. केस मुंबई उच्च न्यायलयात हलवली गेली तेव्हा शाहरुख यांनी मुकुल रोहतगी यांना केस लढवण्यासाठी आणले.