Cardamom Price: मसाल्यांची राणी महागली, दर 3500 रुपये किलोवर, कारण काय? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
सध्या इलायची साडेतीन हजार रुपये किलोवर गेली असून एका तोळ्यासाठी ग्राहकाला 30 ते 40 रुपये मोजावे लागत आहेत. मागील काही महिन्यांत इलायचीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले.
छत्रपती संभाजीनगर : सध्या इलायची साडेतीन हजार रुपये किलोवर गेली असून एका तोळ्यासाठी ग्राहकाला 30 ते 40 रुपये मोजावे लागत आहेत. मागील काही महिन्यांत इलायचीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. इलायचीचे कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पाच, सात आणि नऊ एमएम अशा लहान-मोठ्या आकाराने मिळणाऱ्या इलायचीचे 2600 रुपयांपासून ते 3300 रुपयांपर्यंत दर आहे. तसेच हे दर दिवाळीपर्यंत स्थिर राहणार असल्याचे होलसेल किराणा विक्रेते ललित धोका यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
इलायचीचे भाव का वाढले?
कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांतून इलायची छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत येते. परंतु या उत्पादन पट्ट्यात यंदा पावसाचे जास्त प्रमाण, कीड रोग आणि मजुरांची टंचाई यामुळे उत्पादन घटले. मागणी मात्र कायम असल्याने व्यापाऱ्यांकडे आलेली मर्यादित आवक उच्च दराने विकली जात आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किराणा व चहाच्या दुकानांमध्ये सर्वत्र इलायचीच्या दरवाढीची चर्चा रंगत असून, चहात इलायचीचा स्वाद घेणे आता सामान्य ग्राहकाला महागात पडू लागले आहे. मुंबई, पुणे आणि अहिल्यानगरातले व्यापारी छत्रपती संभाजीनगरमध्ये इलायची पुरवण्याचे काम करतात.
तसेच साधारणपणे आठ एमएमची इलायची जास्त प्रमाणात विक्री होत असल्याचे इलायची विक्रेते सांगतात. महागाईच्या या लाटेत इलायचीने खरोखरच आपली ‘मसाल्यांची राणी’ ही ओळख टिकवून ठेवली आहे, मात्र तिच्या सुगंधासोबतच किमतीचा तडका आता जिभेवर चांगलाच जाणवू लागला आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
September 20, 2025 6:15 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Cardamom Price: मसाल्यांची राणी महागली, दर 3500 रुपये किलोवर, कारण काय? Video