इलायचीचे भाव का वाढले?
कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांतून इलायची छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत येते. परंतु या उत्पादन पट्ट्यात यंदा पावसाचे जास्त प्रमाण, कीड रोग आणि मजुरांची टंचाई यामुळे उत्पादन घटले. मागणी मात्र कायम असल्याने व्यापाऱ्यांकडे आलेली मर्यादित आवक उच्च दराने विकली जात आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किराणा व चहाच्या दुकानांमध्ये सर्वत्र इलायचीच्या दरवाढीची चर्चा रंगत असून, चहात इलायचीचा स्वाद घेणे आता सामान्य ग्राहकाला महागात पडू लागले आहे. मुंबई, पुणे आणि अहिल्यानगरातले व्यापारी छत्रपती संभाजीनगरमध्ये इलायची पुरवण्याचे काम करतात.
तसेच साधारणपणे आठ एमएमची इलायची जास्त प्रमाणात विक्री होत असल्याचे इलायची विक्रेते सांगतात. महागाईच्या या लाटेत इलायचीने खरोखरच आपली ‘मसाल्यांची राणी’ ही ओळख टिकवून ठेवली आहे, मात्र तिच्या सुगंधासोबतच किमतीचा तडका आता जिभेवर चांगलाच जाणवू लागला आहे.