डॉ.सविता आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पहिलाच चित्रपट, फ्रान्सच्या कान्समध्ये गौरवाचा क्षण, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
डॉ. सविता भीमराव आंबेडकर हा चित्रपट साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाला फ्रान्समधील प्रतिष्ठित कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेस्ट इंडियन फिल्म अवॉर्ड जाहीर झाला
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाई यांच्या जीवनावर आजपर्यंत अनेक कथा, कादंबऱ्या, साहित्यकृती आणि चित्रपट साकारले गेले आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित साहित्य किंवा चित्रपट फारसे पाहायला मिळत नाहीत. त्यांच्या जीवनातील सत्य, त्यांचे योगदान आणि त्यांच्याविषयी समाजात निर्माण झालेल्या गैरसमजांना दूर करण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच त्यांच्या जीवनावर आधारित माईसाहेबांचे डॉ. आंबेडकरांच्या सहवासात हे जीवन चरित्र आलेले आहे.
यावर माईसाहेब डॉ. सविता भीमराव आंबेडकर हा चित्रपट साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाला फ्रान्समधील प्रतिष्ठित कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बेस्ट इंडियन फिल्म अवॉर्ड जाहीर झाला असल्याची माहिती सुप्रसिद्ध नाटककार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते प्रकाश त्रिभुवन यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
माईसाहेब डॉ. सविता भीमराव आंबेडकर या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी पूर्ण 3 वर्षे लागली आहे. माईसाहेबांवरील हा पहिलाच चित्रपट असल्याने साहित्य आणि ऐतिहासिक संदर्भ मिळवणे कठीण गेले. माईसाहेबांना बाबासाहेबांच्या निधनानंतर पंधरा वर्षे अज्ञातवासात राहावे लागले. या सर्व घटनांची माहिती घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. सेन्सॉर बोर्डाकडे या विषयाचे तज्ज्ञ नसल्याने चित्रपटाला 6 महिन्यांच्या अधिक कालावधीनंतर परवानगी मिळाली, असे देखील त्रिभुवन यांनी सांगितले.
advertisement
महाराष्ट्रात कलावंतांची कमी नाही, खूप हुशार मुले आहेत, मराठवाड्यातील देखील नवीन मुले चित्रपट, नाटक, संगीत क्षेत्रात दिसत आहेत. त्यामुळे यानंतर देखील चित्रपट सृष्टीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्राचे ज्ञान घ्यावे. त्यामध्ये ड्रामॅटिक, फिल्म मेकिंग हे सर्व कोर्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई येथे उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टींचे शिक्षण घेतले पाहिजे. मेहनत घेतली पाहिजे यश नक्की मिळते, असे देखील त्रिभुवन म्हणाले.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
November 04, 2025 7:11 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
डॉ.सविता आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पहिलाच चित्रपट, फ्रान्सच्या कान्समध्ये गौरवाचा क्षण, Video

