Cotton Thrown: अवकाळीमुळे वेचणीचा कापूस भिजला, मराठवाड्यात शेतकऱ्याचा उद्रेक; रस्त्यावर उधळला कापूस
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
पावसामुळे कापसाचे झालेले नुकसान आणि बाजारात मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घनसावंगी येथे रस्त्यावरच कापूस उधळला आहे.
पावसामुळे कापसाचे झालेले नुकसान आणि बाजारात मिळत असलेला अत्यल्प दर यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घनसावंगी येथे रस्त्यावरच कापूस उधळला आहे. खत आणि इतर कृषी निविष्ठांचे दर सातत्याने वाढत आहेत. कापूस वेचणीसाठी मजूर 15 रुपये किलो एवढा भाव मागतात. परंतु शेतकऱ्यांच्या कापसाला सहा ते सात हजार रुपये क्विंटल असा दर मिळत असल्याने हा संताप पाहायला मिळाला.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शेतकरी किशोर सोमवारी यांच्याकडे दीड एकर शेत जमीन आहे. कापूस वेचण्यासाठी मजुरांना 12 ते 15 रुपये प्रति किलो या पद्धतीने भाव द्यावा लागत आहे. पावसामुळे कापूस भिजल्याने व्यापारी कापसाला सहा ते सात हजार रुपये एवढाच दर देत आहेत. यामुळे किशोर सोमवारे यांचा उद्रेक पाहायला मिळाला. ओल्या झालेल्या कापसाला काडी तरी लागेल काय.
advertisement
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करू असं सरकार म्हणलं होतं, सरकारने शेतकऱ्यांना चॉकलेट दिले आहे. व्यापारी कापसाला सहा हजार रुपये भाव देत असून त्यातही एक किलो कापूस कट करत आहेत. शेतकऱ्यांना आपलं कारण मांडावं तरी कुणाकडे अशा शब्दात शेतकऱ्याचा संताप पाहायला मिळाला. तर दुसरीकडे कापूस वेचणीसाठी गेल्यानंतर महिलांना कापसाऐवजी कापसाची झाड हाती येत आहे. सतत झालेल्या पावसाने कापसातील फुगलेल्यासारख्यांना कोंब फुटले असून यामुळे कापसाच्या गुणवत्तेत घसरण झाली आहे.
advertisement
खत औषधांच्या वाढलेल्या किंमती आणि शेतमालाच्या पडलेल्या किंमती यामुळे आम्ही आमच्या मुलाबाळांचे शिक्षण कसं करावं? असा सवाल छाया भुतेकर या महिला शेतकऱ्याने सरकारला केला आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 04, 2025 6:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Cotton Thrown: अवकाळीमुळे वेचणीचा कापूस भिजला, मराठवाड्यात शेतकऱ्याचा उद्रेक; रस्त्यावर उधळला कापूस

