Success Story: दहावीत 3 वेळा झाला नापास, अखेर नयनने MPSC परिक्षा केली पास, प्रेरणादायी संघर्षगाथा!

Last Updated:

सातवीत नापास आणि दहावीत तीन वेळा नापास झालेल्या नयन वाघ या तरुणाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात घवघवीत यश मिळविले आहे.

+
नयन

नयन वाघ

कर्जत तालुक्यातील ऐनाचीवाडी हा परिसर म्हणजे अत्यंत दुर्गम भाग आहे. ही अल्पशिक्षित आदिवासीवाडी शिक्षणापासून आज ही तरुणाई वंचित आहेत. त्यामुळे तिथे बोटावर मोजण्याइतकीच लोकं शिकलेली आज ही दिसतात. त्याच गावाचा एक तरुण जो सातवी नापास, दहावी तीन वेळा नापास तो तरुण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात 15 वा क्रमांक मिळविला आहे.
दहावीच्या परीक्षेत नापास झालेला पण महाराष्ट्रात अव्वल आलेला या तरुणाचं नाव नयन विठ्ठल वाघ आहे. घरची परिस्थिती खूप बेताची घरात शिकलेले कोणी नसल्याने त्यामुळे या तरुणाला अभ्यासात आवड नव्हती परंतु चौथीपर्यंत प्राथमिक शिक्षण झुगरेवाडी येथे घेतले. पुढील शिक्षण शासकीय आश्रम शाळेत कान्होळा येथे घेऊन त्यानंतर पुन्हा साफेवाडीच्या आश्रम शाळेत प्रवेश घेतला. अभ्यासात चांगला नसल्याने सातवीपासून नयन वाघची गाडी अडखळत गेली ती दहावी पर्यंत.
advertisement
परिस्थिती बेताची असल्याने स्वप्न ही निराश होतात. परंतु सत्याचा विजय होतोच असे जरी म्हटलं वावगं ठरणार नाही. नयन या तरुणाची कहाणी जरा वेगळीच ठरली. दहावीत तीन वेळा नापास झालेल्या नयनच्या उंच भरारीचे खरे मार्गदाता प्राथमिक शिक्षक पुंडलिक कंटे हे ठरले. तरुणाचा आयुष्यात मार्गदर्शक आणि मार्गदाता असणे खूप गरजेचे आहे. नाहीतर आज हा तरुण आई वडिलांसोबत गावातच शेती करत बसला असता. दहावीत अपयश आल्याने तो खचला नाही. पुन्हा 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा दिली आणि 2016 मध्ये ग्रॅज्युएशन कोकण ज्ञानपीठ कर्जत येथून पुर्ण केले आणि त्यांची खरी सुरुवात  झाली.
advertisement
डोळ्यात नेहमी बापाच्या कष्टाची आणि आईच्या प्रेमाची काळजी असायची त्यामुळे पुन्हा पुन्हा जिंकण्यासाठी आयुष्याच्या रणांगणात हा तरुण उभा राहत होता. 2016 ते 2018 पर्यंत पोलिस भरतीची तयारी केली. त्यातही हा तरुण अपयशी झाला. नंतर 2019 ला MPSC परीक्षांची तयारी सुरू केली. 2020 आणि 2021 मध्ये पुर्व परीक्षेत तो नापास झाला. नंतर 2022 मध्ये हाच तरुण नयन वाघ पोलीस उप निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यावेळी एकीकडे अपयश पेलवत दुसरीकडे यशाचे स्वागत करत PSI ची पुर्व, मुख्य परीक्षा पास झाला. शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेला हा तरुण PSIची स्वप्ने घेऊन मैदानी चाचणी देण्यासाठी सज्ज झाला.
advertisement
31मे 2024 रोजी शारीरिक चाचणी देताना नयनचा पाय मोडला. त्यामुळे त्याचे PSI होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. तेव्हा मात्र या तरुणाची प्रतिक्रिया ही सर्व स्वप्न धुळीला मिळाल्यासारखी झाली. तेव्हा सचिन गायकवाड यांचे मार्गदर्शन सुरू मिळाले आणि पुन्हा नयनने त्याच जोशाने परीक्षेच्या तयारीला लागला. 2024 ची MPSC राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि मुलाखत पास होऊन ST category मधून 15 वा रॅंक मिळवून अधिकारी पदाला गवसणी घातली. परिस्थिती वाईट होती पण वेळ चांगली असल्याने खरे मार्गदाता या तरुणाला मिळत गेले. जन्मापासून पाचवीत पुजलेले अपयशावर मात करत आज यशाच्या शिखरावर जाऊन नयन वाघ पोचला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Success Story: दहावीत 3 वेळा झाला नापास, अखेर नयनने MPSC परिक्षा केली पास, प्रेरणादायी संघर्षगाथा!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement