Rahul Dravid Son : अर्जुन वाट पाहत राहिला, द्रविडचा पोरगा पुढे निघून गेला, भारतीय क्रिकेटच्या मोठ्या सीरिजमध्ये निवड!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
राहुल द्रविड याचा मुलगा अन्वय द्रविड याची बीसीसीआयच्या मोठ्या स्पर्धेत निवड झाली आहे. अन्वयने मागच्या महिन्यात वीनू मंकड ट्रॉफीमध्ये कर्नाटकचं नेतृत्वही केलं होतं.
मुंबई : टीम इंडियाचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविडने निवृत्तीनंतर कोचिंगमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली. द्रविड प्रशिक्षक असताना भारताने टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला. राहुल द्रविडची दोन्ही मुलंही आता क्रिकेट खेळत आहे. द्रविडचा लहान मुलगा अन्वय द्रविड मागच्या काही काळापासून चर्चेत आहे. नुकताच अन्वय द्रविडचा कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने वार्षिक सोहळ्यात गौरव केला. अन्वयने मागच्या महिन्यात वीनू मंकड ट्रॉफीमध्ये कर्नाटकचं नेतृत्वही केलं. आता अन्वय द्रविडची भारतातल्या एका मोठ्या स्पर्धेत निवड झाली आहे.
राहुल द्रविडचा मुलगा टीममध्ये
राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविडची बुधवारी हैदराबादमध्ये सुरू होणाऱ्या पुरुष अंडर-19 वनडे चॅलेंजर ट्रॉफीसाठी टीममध्ये निवड झाली आहे. ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते, ज्यात युवा खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. स्पर्धेतल्या चार टीमपैकी एका टीममध्ये अन्वय द्रविडची निवड झाली आहे. टॉप ऑर्डर बॅटर आणि विकेटकीपर असणारा अन्वय त्याच्या आक्रमक बॅटिंगसाठी ओळखला जातो. ही स्पर्धा 5 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2025 दरम्यान हैदराबादमध्ये खेळवली जाणार आहे.
advertisement
अन्वय द्रविड ज्या टीमकडून खेळणार आहे, त्याचं नेतृत्व एरॉन जॉर्जकडे असेल, तर आर्यन यादव टीमचा उपकर्णधार असेल. टीमचा पहिला सामना शुक्रवारी टीम बी विरुद्ध होणार आहे, ज्याचं नेतृत्व वेदांत त्रिवेदी करणार आहे. अन्वय द्रविड या सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. अन्वय द्रविडकडे या सामन्यात छाप सोडण्याची मोठी संधी आहे.
राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित द्रविडही बॅटर आहे. समितने काहीच दिवसांपूर्वी महाराजा टी-20 केएससीए ट्रॉफीमध्ये टॉप ऑर्डर बॅटर म्हणून काही मॅच खेळल्या होत्या.
advertisement
अंडर-19 वनडे चॅलेंजर ट्रॉफीच्या टीम
टीम ए : विहान मल्होत्रा (कर्णधार), अभिज्ञान कुंडू, वंश आचार्य, बालाजी राव, लक्ष्य रायचंदानी, विनीत व्ही के, मार्कंडेय पांचाळ, सात्विक देसवाल, व्ही यशवीर, हेमचुदेशन जे, आरएस अंब्रीश, हनी प्रताप सिंग, वासू देवानी, युधाजीत गुहा, इशान सूद
टीम बी : वेदांत त्रिवेदी (कर्णधार), हरवंश सिंह, वाफी कच्छी, सागर विर्क, सायन पॉल, वेदांत सिंग चौहान, प्रणव पंत, एहित सलारिया, बीके किशोर, अनमोलजीत सिंग, नमन पुष्पक, डी दीपेश, मोहम्मद मलिक, मोहम्मद यासीन सौदागर, वैभव शर्मा
advertisement
टीम सी : एरॉन जॉर्ज (कर्णधार), आर्यन यादव, अनिकेत चॅटर्जी, मणिकांत शिवानंद, राहुल कुमार, यश कासवकर, अन्वय द्रविड, युवराज गोहिल, खिलन ए पटेल, कनिष्क चौहान, आयुष शुक्ला, हेनिल पटेल, लक्ष्मण पृथी, रोहित कुमार दास, मोहित उल्वा
टीम डी : चंद्रहास दश (कर्णधार), मौल्यराजसिंग चावडा, शांतनू सिंग, अर्णव बुग्गा, अभिनव कन्नन, कुशाग्र ओझा, आर्यन सकपाळ, ए रापोले, विकल्प तिवारी, मोहम्मद एनान, आयान अकरम, उद्धव मोहन, आशुतोष महिडा, एम तोषित यादव, सोलिब तारिक
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 7:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rahul Dravid Son : अर्जुन वाट पाहत राहिला, द्रविडचा पोरगा पुढे निघून गेला, भारतीय क्रिकेटच्या मोठ्या सीरिजमध्ये निवड!


