TRENDING:

Actress Life: सलग 30 तास शूटिंग, 3 दिवस उपाशी राहिली अभिनेत्री; सेटवरच पडली बेशुद्ध

Last Updated:

अभिनेत्री अशनूर कौर आज टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत छोटी नायराची भूमिका तिने साकारली आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून घेतले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री अशनूर कौर आज टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत छोटी नायराची भूमिका तिने साकारली आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून घेतले. पण या यशामागे तिला किती संघर्ष करावा लागला, हे तिच्याच तोंडून ऐकून चाहते थक्क झाले आहेत.
3 दिवस उपाशी राहिली अभिनेत्री; सेटवरच पडली बेशुद्ध
3 दिवस उपाशी राहिली अभिनेत्री; सेटवरच पडली बेशुद्ध
advertisement

बिग बॉस 19 मध्ये प्रवेश करण्यापूर्वी अशनूरने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या कारकिर्दीतील धक्कादायक अनुभव शेअर केले. ती सांगते, “वयाच्या 6 व्या वर्षी मी ‘शोभा सोमनाथ’ मध्ये काम करत होते. त्या काळात मला सलग 30 तास शूटिंग करावे लागले. एवढ्या लहान वयात एवढं काम करणं खूप अवघड होतं.”

 एका मुलीची आई, तरी 35व्या वर्षी एग्ज फ्रीझ करायला गेली; डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून अभिनेत्री धक्क्यात

advertisement

तिने पुढे सांगितले की इतक्या तासांच्या शूटिंगनंतर ती थकून भागून व्हॅनिटी वॅनमध्ये कोसळली होती. तिची आई तिला काही तास झोपायला लावायची आणि बाहेर प्रॉडक्शन टीम थांबून असायची. झोपेतून उठल्या उठल्या अशनूर पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभी राहायची.

पण खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे अशनूरने स्वतःच उघड केलेली गोष्ट “मी माझ्या शरीरयष्टीबाबत खूप सजग झाले होते. कधी कधी काहीही न खाता फक्त पाण्यावर दिवस काढायचे. अगदी तीन दिवस उपाशी राहिले, तरी मी कोणालाही काही सांगितले नाही. यामुळे मी सेटवर बेशुद्धही पडले.”

advertisement

सध्या मात्र अशनूरने स्वतःसाठी एक ठाम नियम बनवला आहे. ती म्हणते “आता मी दिवसाला जास्तीत जास्त 12 तासच काम करते. माझं आरोग्य माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”

मराठी बातम्या/मनोरंजन/
Actress Life: सलग 30 तास शूटिंग, 3 दिवस उपाशी राहिली अभिनेत्री; सेटवरच पडली बेशुद्ध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल