अभिनेत्री प्रिया बेर्डे अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची भाची आहे असं सांगितलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. प्रिया आणि निवेदिता या दोघी अभिनेत्री एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. पण त्यांच्यात मामी आणि भाचीचं नातं देखील आहे. स्वत: निवेदिता सराफ आणि प्रिया बेर्डे यांनी हा खुलासा केला आहे. चला हवा येऊ द्याच्या एका एपिसोडमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या तेव्हा त्यांना हा किस्सा सांगितला.
advertisement
( हेही वाचा - शिवानी रांगोळेच्या रिअल आईला पाहिलंत? पाहा विराजसच्या सासूबाईंचे फोटो )
प्रिया बेर्डे यांनी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, थरथराट सिनेमाच्या वेळेस सगळ्यांचं पॅकअप झालं. त्यावेळी निवेदिता सराफ या रडत असल्याचं प्रिया बेर्डे यांना दिसलं. त्यांनी निवेदिता यांना विचारलं की, "काय झालं?" त्यावर रडत रडत निवेदिता यांनी उत्तर दिलं, "मला, मला अशोकची आठवण येतेय".
त्यावेळी "अशोक म्हणजे कोण" असा प्रश्न प्रिया बेर्डे यांना पडला. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारलं की "अशोक म्हणजे कोण?" त्यावर ते म्हणाले "अग मामा, अशोक मामा". त्यावेळी प्रिया बेर्डे एकदम हबकल्या आणि म्हणाल्या, "मामा, म्हणजे ही मामी".
प्रिया बेर्डे यांनी सांगितलेल्या या किस्स्यानंतर निवेदिता सराफ यांनी त्यांच्या प्रिया बेर्डे यांच्या नात्यामागचं सत्य सांगितलं. त्या म्हणाल्या, "हो कारण प्रियासाठी अशोक खरोखर मामा आहे. लता ताई म्हणजेच प्रिया बेर्डे यांच्या आई अशोक सराफ यांना राखी बांधायच्या. अशोक सराफ यांनी प्रिया बेर्डे यांना लहानपणापासून पाहिलं आहे. अनेकदा प्रिया बेर्डे यांना अशोक सराफ यांनी कडेवर खेळवलं आहे".
यावेळी बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या, "त्यामुळे मी तिची ऑफिशिअल मामी आहे. त्यामुळे मामी म्हणून मी आजही तिचे कान पिळू शकते. तिच्यासाठी अशोक खरोखरच मामा आहे".