अभिनेता रजत बेदीने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मुकेश खन्नाने त्याच्या जुन्या वक्तव्याचा गैरसमज निर्माण केला. त्यांनी व्ह्यूजसाठी माझ्या स्टेटमेंटचा चुकीचा वापर केला. तो म्हणाला, "मी एका मुलाखतीत फक्त एवढंच सांगितलं होतं की ‘कोई मिल गया’ नंतर मी कॅनडाला गेलो. पण त्यांनी माझ्या शब्दांचा अर्थच बदलला. त्यांनी असा दावा केला की मला चित्रपटाच्या प्रमोशनमधून वगळलं गेलं म्हणून मी भारत सोडलं. हे पूर्णपणे खोटं आहे."
advertisement
निक्की तांबोळी संतापली, धनश्री वर्माचा गेम प्लॅन केला उघड; BF अरबाजलाही झापलं
रजत पुढे म्हणाला की, "तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळवण्यासाठी असं चुकीचं दाखवणं योग्य नाही. त्या मुलाखतीच्या आठवडाभर आधीच मी राकेश रोशन सरांसोबत भेटलो होतो. आमचं अजूनही चांगलं नातं आहे." रजतने स्पष्ट केलं की त्याचा हेतू कधीच राकेश रोशन किंवा चित्रपटाच्या टीमवर टीका करण्याचा नव्हता.
रजत बेदीने पहिल्यांदाच कबूल केलं की त्याने कॅनडाला जाण्याचा निर्णय आर्थिक कारणांमुळे घेतला होता. तो म्हणाला, “सनी देओलसोबत केलेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मला मिळालेले काही धनादेश बाऊन्स झाले. माझं घर चालवणं कठीण झालं होतं. त्यामुळे काही काळासाठी कॅनडाला जाणं गरजेचं वाटलं.”
2003 साली प्रदर्शित झालेल्या “कोई मिल गया” या चित्रपटात रजतने हृतिक रोशनचा विरोधी पात्र साकारलं होतं. त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आणि तो प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. मात्र, चित्रपटानंतर त्याची अनेक दृश्यं एडिटमध्ये काढून टाकली गेल्याने त्याला निराशा झाली होती. दीर्घ काळानंतर रजत बेदी पुन्हा एकदा “बॅड्स ऑफ बॉलीवूड”मधून झळकला. त्याच्या स्टायलिश लुक आणि अभिनयाने प्रेक्षक पुन्हा त्याच्या प्रेमात पडले. सोशल मीडियावर त्याचं कौतुक होत आहे.