TRENDING:

Video : रॅम्प वॉक केला, बोलायला तोंड उघडलं आणि पडले दात; पुढे सौंदर्यवतीने जे केलं ते यापेक्षाही आश्चर्यकारक

Last Updated:

Beauty Show Contestant Teeth Fall : सौंदर्य स्पर्धेत रॅम्पवर आलेल्या सौंदर्यवतीचे दात अचानक पडले, त्यानंतर तिने जे केलं त्याचा कुणी विचारही केला नसेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रॅम्पवर उफ्फ्स मुव्हेमेंट्स काही मॉडेल्स, ब्युटी क्वीन्स किंवा अगदी अभिनेत्रींसोबतही झाल्या आहेत. कुणी पडलं, कुणाचा ड्रेस फाटला असे प्रकार आपण पाहिले आहेत. पण एक सौंदर्यवतीला विचित्र क्षणाला सामोरं जावं लागलं. रॅम्वर असताना तिचे चक्क दात पडले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

सौंदर्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत घडलेली ही घटना. स्पर्धक मॉडेल चालत रॅम्पवर आली आणि आपली ओळख करून देत होती. तिने माइकवर बोलण्यासाठी तोंड उघडलं. काही शब्द ती बोलली आणि तिच्या तोंडातील दातच बाहेर पडले. अर्थात हे नकली दात होते. पण तरीसुद्धा हा क्षण कित्येकांसाठी लाजिरवाणा ठरणारा आहे. सगळ्यांसमोर असं घडलं तर कुणाचाही आत्मविश्वास ढासळले.

advertisement

Rinku Rajguru : डार्लिंग, तुझ्या प्रेमात वेडी झालीये! अखेर रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची दिली कबुली, ही पोस्ट कुणासाठी?

पण या सौंदर्यवतीला दाद द्यायला हवी. तिने रॅम्पवर दात पडल्यानंतर जे केलं ते कौतुकास्पद आहे. तिचं सगळे जण कौतुक करत आहे. जसे तोंडातील दात बाहेर आले, तसा तिने आपला चेहरा थोडा मागे फिरवला. पाठमोरी राहून क्षणाचाही विलंब न करताना तिने स्वत:च ते दात तोंडात फिक्स केली आणि पुन्हा त्याच आत्मविश्वासने ती रॅम्पवर चालत आली.

advertisement

मिस ग्रँड थायलंड सौंदर्य स्पर्धेतील हे दृश्य आहे. कमोलवान चनागो असं या सौंदर्यवतीचं नाव आहे. ती मिस ग्रँड पाथुम थानीचं प्रतिनिधीत्व करत होती. स्टेजवर स्वतःची ओळख करून देत असताना अचानक तिची कवळी सैल झाली आणि ती पडली. पण तिने अगदी चांगल्या पद्धतीने ही संपूर्ण परिस्थिती हाताळली.

काठावर पास तरीही झक्कास! सगळ्या विषयात 35%, Bigg Boss गाजवणारा हा स्पर्धक कोण?

advertisement

तसंच हसतमुखाने आणि पूर्ण आत्मविश्वासाने तिने मंचावर पुढे पाऊल टाकलं. कमोलवानने केवळ आपला वॉक पूर्ण केला नाही, तर स्टेजच्या शेवटी पोझही दिली.  यावरून हे दिसून येतं की खरं सौंदर्य फक्त चेहऱ्यात नसतं, तर आत्मविश्वासात असतं.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. काही जण तिची खिल्ली उडवत आहेत, तर अनेक जण तिच्या धैर्याचे आणि समजूतदारपणाचं कौतुक करत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एक दिवस कधी चुकला नाही! गरिब रुग्णांसाठी 15 वर्षांपासून घाटी रुग्णालयात मोफत जेवण, जैन अलर्टचा उपक्रम
सर्व पहा

मिस ग्रँड थायलंडचा अंतिम सोहळा लवकरच येत असून विजेतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे मिस ग्रँड इंटरनॅशनल 2026 ही स्पर्धा यावर्षी भारतात आयोजित केली जाणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Video : रॅम्प वॉक केला, बोलायला तोंड उघडलं आणि पडले दात; पुढे सौंदर्यवतीने जे केलं ते यापेक्षाही आश्चर्यकारक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल