TRENDING:

Big Boss Marathi च्या घरात पहिल्याच आठवड्यात ट्विस्ट, नॉमिनेट झालेल्या 9 जणांमध्ये कोण गेलं घराबाहेर?

Last Updated:

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा पहिला वीक एन्ड पार पडला आहे. पहिल्याच आठवड्यामध्ये 9 स्पर्धक घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले, पण यामध्ये आता नवा ट्विस्ट आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा पहिला वीक एन्ड पार पडला आहे. पहिल्याच आठवड्यामध्ये दिपाली सय्यद, करण सोनावणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, अनुश्री माने, सागर कारंडे, दिव्या शिंदे, रोशन भजनकर आणि राधा पाटील हे नऊ स्पर्धक नॉमिनेट झाले, त्यामुळे पहिल्या आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार? याबाबत उत्सुतका निर्माण झाली होती, पण पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात ट्विस्ट पाहायला मिळाला.
Big Boss Marathi च्या घरात पहिल्याच आठवड्यात ट्विस्ट, नॉमिनेट झालेल्या 9 जणांमध्ये कोण गेलं घराबाहेर?
Big Boss Marathi च्या घरात पहिल्याच आठवड्यात ट्विस्ट, नॉमिनेट झालेल्या 9 जणांमध्ये कोण गेलं घराबाहेर?
advertisement

पहिल्या आठवड्यामध्ये नॉमिनेट झालेल्या 9 स्पर्धकांपैकी कोणताच स्पर्धक घराबाहेर गेला नाही. पहिला आठवडा असल्यामुळे कोणत्याच स्पर्धकाला एलिमिनेट न करण्याचा निर्णय बिग बॉसने घेतला.

रितेश देशमुखने घेतली शाळा

दरम्यान भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने आठवडाभर धिंगाणा घालणाऱ्या स्पर्धकांची शाळा घेतली आहे. इथे फक्त भाऊगिरी चालणार असं म्हणत रितेशने घरात राडा करणाऱ्या स्पर्धकांना झापलं आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये विशाल आणि ओमकार यांच्यात प्रचंड हाणामारी झाली. दोघांनी एकमेकांचे गळे धरले. दोघांनी टास्कमध्ये प्रचंड बळाचा वापर केला ज्यात ओमकार जखमी झाला. या सगळ्या भांडणांमुळे बिग बॉसला टास्क रद्द करावा लागला. घरातही तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.

advertisement

'भाऊचा धक्का' या विशेष भागात रितेश देशमुखने घरातील माहोल आणि धक्काबुक्की पाहून विशाल आणि ओमकार या स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. रितेश म्हणाला, "हा शो आता फक्त तरुणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हा कार्यक्रम पाहतो." अशा वेळी स्पर्धकांनी दाखवलेलं हे वर्तन चुकीचा आदर्श देत असल्याचं रितेशनं ठणकावून सांगितलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर घसरले, कांदा आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

"आपल्याकडे दोघे आहेत ज्यांना बोलण्यासाठी काहीच नाहीये का? फक्त मारामारी आणि स्वतः:च्या बॉडीचा, ताकदीचा प्रचंड माज आहे ... एकमेकांच्या अंगावर धावून जायचं , धक्काबुक्की करायची, धमक्या द्यायच्या हेच आदर्श तुम्ही प्रेक्षकांना देणार का? विशाल आणि ओमकार, नीट ऐका. हे घर आहे, रस्त्यावरचा नाका नाही जिथे तुमची दादागिरी चालेल. लक्षात ठेवा, हे माझं घर आहे आणि इथे दादागिरी नाही, तर फक्त 'भाऊगिरी' चालणार" अशा शब्दांत रितेशने आपली नाराजी व्यक्त केली.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Big Boss Marathi च्या घरात पहिल्याच आठवड्यात ट्विस्ट, नॉमिनेट झालेल्या 9 जणांमध्ये कोण गेलं घराबाहेर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल