मृत्यू झालेल्या महिलेचा मुलालाही यावेळी गंभीर दुखापत झाली होती. तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे. या प्रकरणी अल्लू अर्जुनने सहानुभूती दर्शवत त्या कुटुंबाला लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही दिले. मात्र हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळताना दिसते आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एका जमावाने अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरात घुसून त्याच्या मालमत्तेची तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
advertisement
एका टोळीने त्याच्या घरात घुसून त्याच्या मालमत्तेची नासधूस केली आहे. हे लोक उस्मानिया विद्यापीठाचे सदस्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करून जेएसीच्या आठ सदस्यांना अटक केली, ज्यांना नंतर ज्युबली हिल्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
उस्मानिया युनिव्हर्सिटी जेएसीच्या अनेक सदस्यांचा समावेश असलेल्या या गटाने अभिनेत्याच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि 4 डिसेंबर रोजी एका सिनेमात चेंगराचेंगरी सारख्या परिस्थितीत मृत्यू झालेल्या 35 वर्षीय महिलेच्या कुटुंबाला एक कोटींची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी आता अल्लू अर्जुन काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.