अभिषेक आणि आकांक्षा यांची पहिली भेट शाळेत झाली. ते 9वीत असताना एकमेकांना भेटले आणि दोघं प्रेमात पडले. कॉलेजनंतरही त्यांचं रिलेशनशिप टिकून राहिलं. जवळपास 10 वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी 2017 मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं.
'दारुच्या नशेत मला जबरदस्ती KISS करण्याचा...' अभिनेत्रीचे प्रसिद्ध डायरेक्टरवर गंभीर आरोप
लग्नानंतर फक्त दीड वर्षातच या जोडप्यात दुरावा वाढला. आकांक्षाच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर अभिषेकचा स्वभाव बदलला. तो तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करू लागला. आकांक्षाला क्रिएटवर व्हायचं होतं, पण अभिषेकने तिच्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न केला. मुलाखतीत आकांक्षाने मोठा दावा केला. तिने अभिषेकवर फसवणुकीचे आरोप केले. "तो आधीसारखा राहिला नाही, मला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत होता," असं तिने स्पष्ट सांगितलं.
advertisement
आकांक्षा जिंदाल ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिच्या इंस्टाग्रामवर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती फॅशन, ट्रॅव्हल आणि लाइफस्टाईलशी निगडित फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. सध्या ती एका कंपनीत सेक्रेटरी म्हणून काम करते.
2018 नंतर आकांक्षाने अभिषेकसोबतचे फोटो काढून टाकले. मात्र, बिग बॉस 19 मध्ये अभिषेकच्या एंट्रीनंतर त्याच्या लग्नाचे जुने फोटो पुन्हा व्हायरल झाले.