अरमानने केलं भाऊ अमाल मलिकच्या खेळाचं कौतुक
नुकतंच अरमान मलिकने ‘टेली चक्कर’ ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला अमालच्या ‘बिग बॉस’मधील खेळाबद्दल विचारण्यात आलं. यावर अरमान म्हणाला, “मी अमालसाठी खूप खूश आहे. तो खूप चांगला खेळतोय. मी तसा ‘बिग बॉस’चा मोठा फॅन नाही, पण अमाल शोमध्ये त्याचं बेस्ट देतोय. तो नुकताच कॅप्टन बनला. त्याची खरी ओळख सगळ्यांसमोर येत आहे.”
advertisement
अमाल त्याच्या स्वभावाप्रमाणे घरातही खूप स्पष्टपणे बोलतो, यावर अरमान म्हणाला, “तो नेहमीच असा आहे. त्याच्या मनात जे काही आहे, ते तो लगेच बोलतो. तो ‘बिग बॉस’च्या घरात असो किंवा बाहेर, त्याचा स्वभाव असाच आहे आणि मला याचा आनंद आहे.”
तान्या मित्तलबद्दलच्या प्रश्नावर अरमान मलिक स्पष्टच बोलला
मुलाखतीत अरमानला एक खूपच मजेशीर प्रश्न विचारण्यात आला. “तुम्ही तान्याला तुमची ‘फ्यूचर भाभी’ म्हणून पाहता का?” या प्रश्नावर अरमान हसत-हसत म्हणाला, “मला वाटतं, आता मला इथेच निघून जायला हवं!” अरमानने या प्रश्नावर काहीही उत्तर देण्यास नकार दिला, पण त्याने आपल्या भावाच्या खेळाचं खूप कौतुक केलं आहे.