'बिग बॉस 19'च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये प्रयाग मोरेने स्टोअर रूममधून घरात एन्ट्री घेतली. तर प्रणितला बिग बॉसने स्टोअर रूमध्येच बंद करुन ठेवलं होतं. प्रयागने इतर सदस्यांचीही भेट घेतली. अनेक स्पर्धकांनी तर प्रयोगला तुझी कॉमेडी प्रणितपेक्षा चांगली असल्याचं म्हटलं. यावेळी प्रयागने त्याच्यात आणि प्रणितमध्ये फक्त दीड वर्षांचं अंतर असल्याचं सांगितलं. यावर प्रयाग म्हणाला,"अर्थात, मोठ्या भावाकडूनच प्रणितकडे टॅलेंट आलं आहे".
advertisement
प्रणितच्या भावाकडून तान्या रोस्ट
प्रयाग यांनी तान्याला रोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. प्रयागने तान्याला विचारलं की ती खरंच 800 साड्या घेऊन आली आहे का? यावर तान्याने उत्तर दिलं की तिच्या घरी एक संपूर्ण फ्लोअर साड्या आणि कपड्यांनी भरलेलं आहे. हे ऐकून घरातील सर्व मंडळी हसू लागली. प्रयागने रोस्ट केल्याचं तान्याला कळलंच नाही.
प्रणितच्या कॉमेडीने वेधलं लक्ष
'बिग बॉस 19'च्या नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये 'फॅमिली वीक'चा विशेष एपिसोड पार पडला. यावेळी प्रणित मोरेच्या कॉमेडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने एकेक करुन सर्वांनाच रोस्ट केलं. घरातील सर्वांनाच त्यांच्या कॉमेडीचा अंदाज आवडला. 'बिग बॉस 19' हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला असून या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. सोशल मीडिया ट्रेंडनुसार, प्रणित मोरेला सर्वाधिक वोट्स मिळाले आहेत. प्रणित मोरेच्या भावाची 'बिग बॉस 19'च्या घरात एन्ट्री झाली त्यावेळी तो छोटा भाचा अभीरलाही घेऊन आला होता. अभीरला पाहताच महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे ढसाढसा रडला.
