Chhatrapati Sambhajinagar: जिथं रक्त सांडलं, तिथंच फिरवला बुलडोझर, छ. संभाजीनगरात धडक कारवाई, Video
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने पुन्हा पाडापाडी सुरू केली आहे. पैठण गेट परिसरातील 35 वर्षे अनधिकृत मार्केट हटवले.
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात अनधिकृत अतिक्रमण हा गंभीर प्रश्न झाला आहे. आता याच अनधिकृत अतिक्रमणाविरोधात छत्रपती संभाजीनगर महापालिका ॲक्शन मोडवर आली असून थेट कारवाई सुरू केली आहे. महानगरपालिकेकडून शहरातील मुख्य भाग असणाऱ्या पैठण गेट परिसरात धडक कारवाई केली. या ठिकाणचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एका युवकाचा खून झाला होता. त्यामुळे महापालिकेने कारवाई सुरू केल्याचे सांगितले जातेय.
महानगरपालिकेने पैठण गेट सब्जी मंडी परिसरातील मुख्य रस्ते मोकळे केले आहेत. 118 पेक्षा अधिक दुकाने, निवासस्थाने, अतिक्रमण भाग जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले आहेत. सब्जी मंडी येथील नऊ मीटर म्हणजे जवळपास तीस फूट रुंद झालेला रस्ता पाहून शहरवासीयांना आश्चर्य वाटले आहे. मनपा पार्किंगच्या बाजूला अनेक मोबाईलची दुकाने, त्यासोबत सर्वात जुने ज्यूस सेंटर होते त्यावर देखील बुलडोझर फिरवण्यात आला. यावेळी महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी त्यासोबत पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी होता.
advertisement
पैठण गेटच्या अगदी समोर सब्जी मंडीमध्ये जाण्यास 9 मीटरचा रस्ता विकास आराखड्यात आहे. या रस्त्यावर एवढे अतिक्रमण होते की तिथून फक्त दुचाकी वाहने ये-जा करू शकत होती. यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे. पैठणगेट परिसरातील 110 व्यापाऱ्यांना महापालिकेने नोटीस बजावून मालकी हक्काची कागदपत्रे, बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी चार ते पाच मालमत्ताधारकांनीच कागदपत्रे सादर केली. अन्य व्यापाऱ्यांकडे कागदपत्रे नसल्याने कारवाई करण्यात आल्याचे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 21, 2025 9:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar: जिथं रक्त सांडलं, तिथंच फिरवला बुलडोझर, छ. संभाजीनगरात धडक कारवाई, Video








