या आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात अनेक मोठे वाद झाले होते. जसे की, कुनिका सदानंदने 'सुर-सुरी' नावाचे विधान चुकीच्या पद्धतीने मांडले. गायक अमाल मलिकने अभिनेत्री अशनूर कौरसाठी भुंकणे हा शब्द वापरला. अभिषेक बजाजने वारंवार दुसऱ्यांना चिडवले. नेहल चुडासमाने वारंवार तान्या मित्तलच्या विरोधात बोलून तिला त्रास दिला. प्रणित मोरेने बसीर अलीची खिल्ली उडवली.
advertisement
एका आयटम साँगमुळे संपलं असतं माधुरीचं करिअर, चढावी लागली कोर्टाची पायरी; बाळासाहेबांनी मिटवलं प्रकरण
सलमानची 'शाळा' उलटली!
एवढे सगळे वाद झालेले असताना, 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खानने अमाल मलिकचे विधान तोडून-मोडून सांगितल्याबद्दल कुनिका सदानंदला आणि अमालसोबत गैरवर्तन केल्याबद्दल अभिषेक बजाजला फटकारले. या वादात अशनूर कौरलाही खेचण्यात आले. तसेच, तान्याविरोधात वारंवार बोलल्याबद्दल नेहल चुडासमाला सुनावण्यात आले. थोडक्यात सांगायचे तर, 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खानने तान्या मित्तल आणि अमाल मलिकचे समर्थन केले, तर इतर स्पर्धकांना दोषी ठरवले.
देवोलीनाने उचलला आवाज
सलमान खानने अमाल मलिकला पाठिंबा दिल्याने अनेक प्रेक्षकांनी 'बिग बॉस' आणि सलमान खानवर बायस्ड असल्याचा आरोप केला. एका 'बिग बॉस'च्या फॅन पेजने अमाल आणि शहबाजचा फोटो शेअर करून लिहिले होते, "परिस्थिती चांगली हाताळल्याबद्दल सलमान खानला अमालचा अभिमान आहे." या पोस्टवर देवोलीना भट्टाचार्जीने कठोर प्रतिक्रिया दिली. तिने लिहिले, "ओह प्लीज! थोडा बदल म्हणून मी 'वीकेंड का वार' पाहिला. एकाच वेळी कितीतरी चुका आणि मूर्खपणा!" देवोलीनाच्या या विधानामुळे 'बिग बॉस'च्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.