गेल्या आठवडावर दिव्या घरात फारशी दिसली नव्हती. तिची तब्येत ठीक नसल्याने खूप शांत होती. तिने मिशन राशन हा टास्क चांगला खेळला मात्र त्यानंतर ती आजारी पडली. ती घरातही फार कोणाशी बोलताना दिसली नाही. पण आता दुसऱ्या आठवड्यात मात्र दिव्या बरी झाली असून सगळ्यांना नडायला तयार झाली आहे.
( 'पुन्हा हे बोलण्याची हिंमत करू नको', अनुश्री माने असं काय बोलली, ज्यामुळे इतका संतापला राकेश बापट )
advertisement
प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, घरातील सदस्य कॅप्टन्सीच्या मुद्द्यावर एकत्र बसले आहेत. यावेळी काही सदस्यांनी दिव्यावर थेट निशाणा साधला आहे. अनुश्री म्हणते, "दिव्या कॅप्टन्सीसाठी पात्र नाही," तर दुसरीकडे रुचिताने मत मांडले की, "कॅप्टन असा असावा ज्याने दोन्ही बाजूंचे म्हणणे नीट ऐकून घेतले पाहिजे. त्यात सचिन आणि सागर यांनी म्हटलं, "दिव्या mature नाहीये अजून, अनुभवाच्या जोरावर दिव्या इतरांपेक्षा थोडी कमी पडते." त्यावर
"अनुभव जन्मत: नसतो"असं रोखठोक उत्तर दिव्या देते.
घरातील सदस्यांनी लावलेल्या आरोपांनंतर दिव्या शांत बसलेली नाही. तिने आपली बाजू मांडली. दिव्या म्हणाली, "अनुभव जन्मतः कोणालाच नसतो. जर तुम्ही असं म्हणत असाल, तर मी तुमच्या सगळ्यांच्या विरोधात उभी राहते!" दिव्याचा हा करारी बाणा पाहून आता घरातील समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
आता दिव्या तिचे मुद्दे घरच्यांना पटवून देऊ शकेल का? की तिला या कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागेल? कोण बनणार घराचा कॅप्टन ? हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
