'पुन्हा हे बोलण्याची हिंमत करू नको', अनुश्री माने असं काय बोलली, ज्यामुळे इतका संतापला राकेश बापट

Last Updated:

अनुश्री असं काय बोलली ज्यामुळे राकेशचा पारा चढला. राकेशनं अनुश्रीला बोट करतच इशारा दिला.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या घरात पहिल्याद आठवड्यात वादाची ठिणगी पडली आहे. पहिल्या आठवड्यात शांत असलेले स्पर्धक आता दुसऱ्या आठवड्यात पेटून उठताना दिसणार आहेत.   नेहमी शांत आणि 'चिल' राहणारा अभिनेता राकेश बापट आज चांगलाच संतापलेला पाहायला मिळणार आहे. अनुश्री माने ही राकेशच्या चिडण्याचं कारण ठरणार आहे. घरात दोघांमध्ये प्रचंड वाद झाला आहे. वाद इतका टोकाला गेला की राकेशनं थेट घर सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अनुश्री असं काय बोलली ज्यामुळे राकेशचा पारा चढला. राकेश इतका भडकला की त्याने अनुश्रीला कडक शब्दात सुनावलं. या वादात घरातील इतर सदस्यही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र राकेशचं डोकं चांगलंच गरम झालं आहे.
advertisement
घरातील वातावरणात तणाव निर्माण झाला जेव्हा अनुश्री आक्रमकपणे राकेशला म्हणाली, "मला कोणीही माझ्या बेडवरून हलवू शकत नाही." तिने पुढे राकेशला उद्देशून म्हटले, "जिथे तू हात धरून मला उठवलंस ना, तिथेच माझ्या डोक्यात गेलास तू."
अनुश्रीचं हे बोलणं ऐकून राकेशचा संयम सुटला. तो संतापून म्हणाला, "हे बोलणं चुकीचं आहे. Do not dare to say that again. आयुष्यात मी २५ वर्षं एवढं काम केलं आहे, कोणाची हिंमत आहे की मला असं कोणी बोलेल?" या वादाने इतकं गंभीर वळण घेतलं की राकेश चिडून ओरडला, "मला या घरात आता थांबायचं नाहीये!" आणि तो तिथून निघून गेला. प्रोमोमध्ये शेवटी बिग बॉसच्या घराचा मुख्य दरवाजा उघडताना दिसतोय. खरंच राकेश घराच्या बाहेर जाणार का? आजच्या भागात नेमकं काय घडणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



advertisement
बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात कोणीच घराबाहेर गेलं नाही. पण जे स्पर्धक आधीच्या आठवड्यात नॉमिनेट होते तेच स्पर्धक पुढेही नॉमिनेट झाले आहेत. बिग बॉसने दिलेला हा ट्विस्ट या आठवड्यात काय रंगत आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'पुन्हा हे बोलण्याची हिंमत करू नको', अनुश्री माने असं काय बोलली, ज्यामुळे इतका संतापला राकेश बापट
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement