Kitchen Tips : राईस चिकट होण्यामागचं कारण काय? सुडसुडीत भात हवा असेल तर गृहिणींनो 'या' Tips नक्की फॉलो करा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी पाणी जास्त होतं, तर कधी तांदळाचा अंदाज चुकतो. "माझा भात हॉटेलसारखा मोकळा आणि सुटसुटीत का होत नाही?" असा प्रश्न जर तुम्हालाही सतावत असेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. चला तर मग, भात चिकट का होतो आणि तो मोकळा करण्यासाठी कोणत्या 'स्मार्ट' ट्रिक्स वापरायच्या.
भात असो किंवा गरमागरम वरण-भात, आपल्या मराठी माणसाचं जेवण भाताशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. पण कधी कधी काय होतं, आपण मोठ्या आवडीने भात लावायला जातो आणि कुकर उघडल्यावर समोर असतो तो मऊ, लगदा झालेला 'चिकट भात'. पाहुणे घरी आले असताना किंवा एखादा खास बेत असताना जर असा भात झाला, तर पूर्ण जेवणाची चवच गेल्यासारखी वाटते.
advertisement
advertisement
भात चिकट का होतो? 'या' 4 चुका टाळाबरेचदा आपण काही छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे भाताचा लगदा होतो:1. पाण्याचं प्रमाण: अंदाज न घेता जास्त पाणी ओतल्यामुळे भात सैलसर आणि चिकट होतो.2. स्टार्चचा थर: तांदळावर नैसर्गिकरित्या स्टार्चचा थर असतो. जर तांदूळ नीट धुतला नाही, तर शिजताना हा स्टार्च डिंकासारखं काम करतो आणि भात एकमेकांना चिकटतो.3. तांदळाचा प्रकार: काही तांदूळ (उदा. आंबेमोहर किंवा इंद्रायणी) हे मुळातच मऊ आणि चिकट होणारे असतात. बिर्याणी किंवा पुलावसाठी बासमती वापरला नाही तर तो मोकळा होत नाही.4. ओव्हर-कुकिंग: तांदूळ गरजेपेक्षा जास्त वेळ शिजला की तो आपला आकार गमावतो आणि त्याचा गोळा होतो.
advertisement
1. हॉटेलसारखा 'मोकळा' भात बनवण्यासाठी 5 खास ट्रिक्सजर तुम्हाला तांदळाचा प्रत्येक दाणा वेगळा आणि फुललेला हवा असेल, तर या पद्धतीचा वापर करून पहा.1. तांदूळ 3-4 वेळा धुवा: तांदूळ शिजवण्यापूर्वी तो स्वच्छ पाण्याखाली 3 ते 4 वेळा धुवा. जोपर्यंत पांढरं पाणी निघून स्वच्छ पाणी दिसत नाही, तोपर्यंत धुवा. यामुळे तांदळातील जास्तीचा स्टार्च निघून जातो.
advertisement
2. भिजत ठेवणे (Soaking): तांदूळ धुवून झाल्यावर तो किमान 15-20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवा. यामुळे तांदळाचा दाणा लांब होतो आणि तो कमी वेळात व्यवस्थित शिजतो.3. पाण्याचे सुवर्ण प्रमाण: साधारणपणे 1 कप तांदळासाठी दीड ते दोन कप पाणी पुरेसे असते. जुना तांदूळ असेल तर पाणी थोडं जास्त लागतं, तर नवीन तांदळाला पाणी कमी लागतं.
advertisement
4. लिंबू आणि तुपाची जादू: भात शिजताना त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा तूप टाका. लिंबामुळे भात पांढराशुभ्र होतो आणि तुपामुळे तांदळाचे दाणे एकमेकांना चिकटत नाहीत.5. वाफेवर मोकळा होऊ द्या: भात शिजल्यावर कुकरचं झाकण लगेच उघडा. भात गरम असतानाच मोठ्या चमच्याने न हलवता 'फोर्क' (काटा चमचा) वापरून हलक्या हाताने तो वर-खाली करा. यामुळे वाफ बाहेर पडते आणि भात मोकळा होतो.
advertisement










