स्मार्टफोन कॅमेरा फक्त फोटोच काढत नाही, करतो बरंच काही; 90% लोकांना माहितीच नाही

Last Updated:
तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा फक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाछी नाही. या माध्यमातून तुम्ही अनके कामं करु शकता. चला जाणून घेऊया ही कामं कोणती आहेत.
1/9
ज्यावेळी आपण कॅमेराविषयी बोलतो तेव्हा त्याचं काम फक्त फोटो काढणं आहे असा विचार आपल्या डोक्यात येतो. जास्तीत जास्त लोक चांगला कॅमेरा असणारा फोन खरेदी करतात. कारण त्यांना फोटो चांगले हवे असतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, फोनचा कॅमेरा फक्त फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठीच नसतो. याचा वापर अनेक दुसऱ्या कामांसाठीही केला जाऊ शकतो.

advertisement
2/9
टीव्ही किंवा एसीचा रिमोट ज्यावेळी काम करत नाही. तेव्हा फोनच्या कॅमेराच्या मदतीने तुम्ही पाहू शकता की, बॅटरी संपली आहे की रिमोट खराब झाला आहे. यासाठी रिमोटला फोनच्या कॅमेरासमोर पकडा आणि रिमोटचं बटण दावा. फोनच्या कॅमेरामध्ये रिमोट बघा.

3/9
रिमोटच्या आयआर ब्लास्टरवर निळा प्रकाश दिसला, तर रिमोट चालू आहे. मात्र आयआर ब्लास्टरवर कोणताही प्रकाश दिसला नाही, तर समजून घ्या की, एकतर रिमोटची बॅटरी बदलण्याची गरज आहे किंवा मग रिमोट खराब झाला आहे.

4/9
दुसरे म्हणजे, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून लहान डिटेल्स स्पष्टपणे पाहू शकता. स्मार्टफोन कॅमेऱ्यांचे झूम आणि ऑटोफोकस इतके प्रगत झाले आहेत की ते भिंग म्हणून वापरले जाऊ शकतात.

5/9
उदाहरण म्हणून पाहिले तर एखादी गोष्ट खुप बारीक अक्षरात लिहिली असेल तर ती झून इन केल्याने जास्त स्पष्ट दिसू लागते. फ्लॅश चालू करुन तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने पाहू शकता.

6/9
कधीकधी आपल्याला काहीतरी मोजण्याची आवश्यकता असते, परंतु आपल्याकडे कोणतेही मोजण्याचे उपकरण नसते. अशा परिस्थितीत, आपल्या फोनचा कॅमेरा खूप उपयुक्त ठरतो. तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही मेजर अॅप वापरू शकता. तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर प्ले स्टोअरवर हजारो अशाच प्रकारचे अॅप्स उपलब्ध आहेत. या अॅप्समुळे स्केल किंवा इतर आवश्यक उपकरणांशिवाय गोष्टी मोजणे सोपे होते.

7/9
तुम्ही अशा ठिकाणी प्रवास करत असाल जिथे तुम्हाला भाषा येत नाही, किंवा तुम्ही अशा रेस्टॉरंटमध्ये जेवत असाल जिथे मेनू वेगळ्या भाषेत लिहिलेला असेल, तर तुमच्या फोनचा कॅमेरा भाषेचा अडथळा दूर करू शकतो. तुम्हाला रिअल टाइममध्ये तुमच्या स्वतःच्या भाषेत मजकूर ट्रान्सलेट करण्यासाठी Google Translate सारखे अॅप वापरावे लागेल, ज्यामुळे तुम्हाला ते समजणे सोपे होईल.

8/9
कधीकधी आपल्याला आपल्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल उत्सुकता असते. आपल्या फोनचा कॅमेरा ती माहिती देऊ शकतो. हे करण्यासाठी, तुम्हाला Google Lens वापरावे लागेल, जे तुम्ही ऑनलाइन घेतलेला कोणताही फोटो शोधते आणि संबंधित माहिती प्रदर्शित करते. म्हणून, तुम्हाला एखाद्याचे बूट, कपडे किंवा घड्याळ दिसले तर, इंटरनेटवर तासंतास शोधण्याऐवजी, तुम्ही ते तुमच्या फोनच्या कॅमेरा वापरून थेट शोधू शकता.

9/9
अनेकदा आपल्याला एखादे डॉक्यूमेंट किंवा पेपर स्कॅन करुन पाठवायचे असते. अशावेळी स्कॅनरचा वापर करण्याऐवजी तुम्ही फोनच्या कॅमेरानेच ते स्कॅन करु शकता. फोनमध्येच पेपर स्कॅन करण्याचा फीचर उपलब्ध असतो. यामुळे वेगळे काही अॅप डाउनलोड करण्याची गरज नसते. आपल्या फोनच्या कॅमेराचा वापर करुन तुम्ही कोणताही पेपर सहज स्कॅन करु शकता.

Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement