Success Story: उच्च शिक्षित तरूणाची व्यवसायाला पसंदी, शेती आणि कुकुटपालनातून 3 लाखांचा नफा
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
शहापूर तालुक्यातील दहागावमध्ये शेती करत असताना शेतीला जोडधंदा म्हणून पवार कुटुंबियांनी एक एकर आंब्याच्या बागेत गावठी कोंबडीचे पालन सुरू केले. शेती आणि कुकुटपालनातून सुधीर पवार यांनी महिन्याकाठी लाखोंची कमाई केली आहे.
ठाणे: शहापूर तालुक्यातील दहागावमध्ये शेती करत असताना शेतीला जोडधंदा म्हणून पवार कुटुंबियांनी एक एकर आंब्याच्या बागेत गावठी कोंबडीचे पालन सुरू केले. कोबड्यांसाठी पत्राचा शेड उभा न करता मोकळे आणि शुद्ध वातावरणात या ठिकाणी कोंबड्यांची वाढ होताना बघायला मिळते, मुख्य म्हणजे या कोंबड्यांना कोणतीही लस किंवा औषधांची गरज नाही.
पूर्णपणे गावठी उपचाराने गेल्या तीन वर्षांपासून ते कुक्कुटपालन करतात. त्यामुळे त्यांच्याकडे गावठी कोंबड्यासोबत अंड्यांना ही प्रचंड मागणी आहे. गावठी कोंबड्याची पूर्णतः सहा महिन्यात वाढ झाली की 1500रु किलो ने त्याची विक्री होते. खऱ्या गावठी कोंबड्यांची खरेदी करायची असेल तर शहापूर आणि मुरबाड तालुका मोठ्या प्रमाणात फेमस आहे. इथे आपल्याला अस्सल गावरान कोंबड्या आणि अंडी बघायला मिळतात.
advertisement
सुधीर पवार यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून कुठेही नोकरीच्या शोधात वेळ घालवला नाही. तर त्यांच्या एक एकर आंब्याच्या बागेत कुक्कुटपालन आणि त्यालाच लागून भाजीपाला लावला. पाच कोंबड्यांवर सुरू केलेला हा व्यवसाय आज 2000 कोंबड्यावर पोहचला. कोंबड्यांसाठी पोल्ट्री हाऊस किंवा पत्रा शेड न करता डायरेक्ट मोकळ्या जागेत त्यांची वाढ होते. शहरापासून हे गाव लांब असल्याने हवेचे किंवा इतर प्रदूषणाचा या ठिकाणी संबंधच येत नाही. त्यामुळे कोंबड्यांना कोणते आजार किंवा कशाचा ही प्रादुर्भाव होत नाही.
advertisement
मार्केटमध्ये बॉयलर कोंबडीचे एक अंड आठ रुपयांनी विकला जाते, तर गावठी कोंबडीचे एक अंड 30 रुपये तेही पूर्णपणे गावठी पद्धतीत वाढ झालेली. सुधीर यांना गेल्या तीन वर्षापासून शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या कुकुट पालन व्यवसायातून एक वर्षाला 3लाख रुपये नफा होतो. त्यातच त्यांना कोणतेही बाहेरचे औषध नसल्याने उपचार पद्धतीचा खर्च ही नाही. पूर्णपणे घरगुती आणि आयुर्वेदिक पद्धतीत संगोपन केले जाते. आजच्या तरुणाईला प्रेरणेचा स्त्रोत म्हणून सुधीर यांनी कोणताही व्यवसाय करा पण त्याला जोड धंदा केला तर नक्कीच यशस्वी होऊ शकतात हे दाखवून दिले आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 6:25 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Success Story: उच्च शिक्षित तरूणाची व्यवसायाला पसंदी, शेती आणि कुकुटपालनातून 3 लाखांचा नफा










