ना रुचिता ना तन्वी, फेमस सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर BBM 6 च्या घरातला चोर, अखेर नाव आलं समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठी 6च्या घरात सोनाली राऊतची चावी चोरणारा चोर सापडला. रितेशनं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवला.
बिग बॉस मराठी 6 सुरू झालं आणि पहिल्याच आठवड्यात घरात फुल ऑन राडा पाहायला मिळाला. घरात चोरी झाल्याचं उघड झालं. जी पावर की घेऊन सोनाली राऊत शॉर्टकटच्या मार्गाने घरात आली होती तिची ती चावीच चोरीला गेली. चावी चोरली कोणी असा प्रश्न घरातील सगळ्यांना पडला. पण चावी नेमकी कोणी चोरी हे कोणीही सांगितलं नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रितेशने भाऊच्या धक्क्यावर एक क्लिप दाखवली ती चावी चोराची होती. चावी चोर हा अनुश्री माने होती. अनुश्रीने चावी चोरली. हा तिचा गेम असल्याचं सांगत तिने चावी चोरल्याचं कबूल केलं. पण मी हे शेवटपर्यंत कोणाला सांगणार नाही. बाहेर आल्यानंतर सगळ्यांना कळेलच. मला सुद्धा सगळ्यांची काळजी आहे. त्यांच्याबरोबर मी देखील जेवले नाही, असं तिने सांगितलं.
advertisement









