आंबेगावात राष्ट्रवादीला मोठा झटका, आढळराव पाटलांचा खंदा समर्थक शिंदेंच्या शिवसेनेत
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट न मिळालेल्या नेत्यांच्या कोलांटउड्या सुरू झाल्या आहेत.
सचिन तोडकर, प्रतिनिधी, आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे नेते, पुणे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे खंदे समर्थक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी आज शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव -जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा अरुण गिरे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र या गटातून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी निश्चित झाल्याने नाराज झालेल्या अरुण गिरे यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय.
advertisement
पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी 2014 मध्ये वळसे पाटील यांच्या विरोधात शिवसेना पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अरुण गिरे हे आढळराव पाटलांसोबत शिंदे शिवसेनेत दाखल झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी अरुण गिरे यांनी आढळराव पाटलांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी अरुण गिरे यांनी आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय.
advertisement
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात प्रवेश करून अरुण गिरे पारगाव -जारकरवाडी जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला सामोरे जावू शकतात, असा अंदाज आहे. अरुण गिरे यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाने आढळराव पाटलांना मोठा धक्का बसला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 7:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आंबेगावात राष्ट्रवादीला मोठा झटका, आढळराव पाटलांचा खंदा समर्थक शिंदेंच्या शिवसेनेत










