advertisement

KDMC : ठाकरेंचे 11 पैकी 9 नगरसेवक अज्ञातस्थळी, दोघं नॉट रिचेबल, कल्याणमध्ये शिंदेंकडून 'ऑपरेशन' सुरू!

Last Updated:

महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना धक्का द्यायच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरेंचे दोन नगरसेवक हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरेंचे 11 पैकी 9 नगरसेवक अज्ञातस्थळी, दोघं नॉट रिचेबल, कल्याणमध्ये शिंदेंकडून 'ऑपरेशन' सुरू!
ठाकरेंचे 11 पैकी 9 नगरसेवक अज्ञातस्थळी, दोघं नॉट रिचेबल, कल्याणमध्ये शिंदेंकडून 'ऑपरेशन' सुरू!
कल्याण : महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना धक्का द्यायच्या तयारीत आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून निवडून आलेले दोन नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नगरसेवकांना त्यांच्या घरी जाऊन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी नोटीस दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाची मंगळवारी गट स्थापन करण्याबाबत बैठक होणार आहे, या बैठकीला उपस्थित राहावं, अशी नोटीस दोन्ही नगरसेवकांना देण्यात आली आहे.
बैठकीला उपस्थित न राहिल्यास पक्ष विरोधी काम केल्याने कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून निवडून आलेले नगरसेवक मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे यांना ही नोटीस देण्यात आली आहे. दोन्ही नगरसेवक घरी उपस्थित नसल्यामुळे मधुर म्हात्रे यांचे वडील आणि किर्ती ढोणे यांच्या बहिणीला ही नोटीस देण्यात आली आहे.
advertisement
फोडाफोड होऊ नये म्हणून ठाकरे गटाने त्यांचे 9 आणि मनसेने त्यांचे 7 नगरसेवक अज्ञातस्थळी ठेवले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत, तर मनसेचे 2 नगरसेवक ठाकरेंच्या चिन्हावर निवडून आले आहेत. पण ठाकरेंच्या 11 पैकी 9 नगरसेवकांनाच अज्ञातस्थळी ठेवलं गेलं आहे, त्यामुळे उरलेले 2 नगरसेवक हे मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे आहेत का? आणि ते नेमके कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
advertisement
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे 53 आणि भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी 62 चा आकडा गाठणं गरजेचं आहे, त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार आहेत. मनसेसोबत युती करून सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीचा महापौर होईल, पण पहिली अडीच वर्ष महापौरपद भाजपला मिळालं पाहिजे, अशी मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. तसंच मनसे आणि ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांनी आमच्यासोबत संपर्क साधल्याचा दावाही नरेंद्र पवार यांनी केला आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC : ठाकरेंचे 11 पैकी 9 नगरसेवक अज्ञातस्थळी, दोघं नॉट रिचेबल, कल्याणमध्ये शिंदेंकडून 'ऑपरेशन' सुरू!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement