धनंजय पोवार हे कोल्हापूरातील नामांकीत प्रस्थ आहेत. डीपी दादा आणि त्यांचा वडिलांचा कोल्हापूरमध्ये सोसायटी फर्निचरचा बिझनेस आहे. अनेक वर्षांपासून ते हा बिझनेस करत आहेत. देशभरातून ग्राहक त्यांच्या दुकानात येतात. डीपी दादा सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याआधी पासून ते हा व्यवसाय सांभाळत आहे. त्यांच्या याच व्यवसायावरून त्यांना ट्रोल करण्यात आलं. पण डीपी दादांच्या ह्युमरपुढे सगळेच फेल आहेत. ट्रोल करणाऱ्याला डीपी दादांनी सडेतोड उत्तर दिलं.
advertisement
( 'लोक राधीही 'ब्रा'वरी म्हणायचे', पहिल्याच मालिकेनंतर श्रुती मराठे का आली वादात? )
डीपी दादांनी इन्स्टाग्रामवर ट्रोल करणाऱ्याची कमेंट त्याच्या नावासकट शेअर केली. सचिन जवाळे नावाच्या एका व्यक्ती सोसायटी फर्निचरवरून डीपी दादांना ट्रोल केलं. त्याने कमेंट करत लिहिलंय, सगळे घरदार नाटककार झाले आहे. सर्व सामान्य माणसाची फसवणूक करून आपला व्यवसाय म्हणजे फर्निचरचे दुकान चालवण्यासाठी, लोकांनी यांचे फर्निचर विकत घ्यावे म्हणजे नाटक पाहायला भेटेल.
या कमेंटवर डीपी दादांनी त्यांच्या स्टाइलने उत्तर दिलंय. त्यांनी या कमेंटचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत ट्रोल करणाऱ्याला चांगलंच झापलं आहे.
डीपी दादांनी लिहिलंय, किती घाणेरडी वृत्ती असेल लोकांची. काय म्हणून हा माझ्या नावाने बोंबलालाय काय माहिती नाही. ऊट सूट काय पण विषय काढायचा आणि बोंबलायचा. अरे बाबा तुला काय मी फसवलंय का? पैसे घेतलेत का? काय तुझं लग्न होईना म्हणून गावाची माप काढत बसणार आहेस.