सूरज चव्हाण त्याच्या 'झापूक झुपूक' स्टाइलमुळे फेमस आहे. काहीही, कुठेही असो तो त्याची 'झापूक झुपूक' स्टाइल त्यामध्ये घुसवत असतो. त्यामुळे लोक त्याला 'झापूक झुपूक किंग'ही म्हणतात. मात्र आजकाल तो सतत प्रत्येक रील असो कोणताही व्हिडिओ असो त्याची फेम स्टेप करत 'झापूक झुपूक' स्टाइल दाखवतो. ही स्टाइल पाहून काही लोक आता इरिटेटेड झाले असून त्यांनी सूरजला त्याची स्टेप बदलून नवं काहीतरी करण्याचा सल्ला दिला आहे. त्याच्या नव्या रीलवर कमेंट करत लोक त्याला ट्रोल करत आहेत.
advertisement
सूरज चव्हाण रील
सूरज चव्हाणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नवं रील शेअर केलं आहे. यामध्येही तो त्याची 'झापूक झुपूक' स्टाइल आणि स्टेप करताना दिसला. सतत तीच स्टेप आणि स्टाइल पाहून काही लोक कंटाळले आहेत. त्यांनी थेट सूरजच्या लेटेस्ट रीलवर कमेंट करत त्याला स्टेप बदलायचा सल्ला दिला.
suraj chavan
दरम्यान, बिग बॉसमधून सूरजला भरभरून प्रेम मिळाले. त्याने महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांचे मन जिंकले आणि त्यांच्या मनात घर केले. प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा आणि मिळणारे प्रेम आणि वोटमुळे सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली.