घरात प्रवेश करताना सचिन कुमावतने आपली ओळख करून दिली. "माझ्या अहिराणी मायबोलीला जगभरात पोहोचवणार आहे. 14 कोटी व्ह्यूजना 14 हजार कोटी व्ह्यूवर घेऊन जायचं स्वप्न आहे", अशी महत्त्वाकांक्षा घेऊन सचिन कुमावत यांनी घरात एन्ट्री केली आहे. खानदेशी संस्कृती, भाषा आणि माणुसकी संपूर्ण महाराष्ट्रासह जगासमोर मांडण्याचा निर्धार त्याच्या बोलण्यातून दिसून आला.
advertisement
सचिन कुमावत खान्देशच्या मातीतून, कष्टातून उभा राहिलेला कलाकार आहे. याच मेहनतीवर विश्वास ठेवत त्यांनी घरात एन्ट्री घेतली आहे. "मेहनत करून आलोय आणि मेहनत करूनच जाईन", असं ठामपणे म्हणत त्यानी मेहनतीचं दार निवडलं. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात जाताना त्यांना हातात पिठाचा डब्बा घेऊन आत पाठवलं.
सामान्य कुटुंबातून आलेला, मेहनतीच्या जोरावर नाव कमावलेला सचिन बिग बॉसच्या घरात काय रंगत आणणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जय खान्देश! अशा घोषणेसह सचिन कुमावत यांनी बिग बॉसमध्ये केलेल्या एन्ट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. केलेली ही एन्ट्री बिग बॉस मराठी 6 मध्ये नवा रंग भरणारी ठरेल, यात शंका नाही. त्याची स्पष्ट भूमिका, आत्मविश्वास आणि अहिराणी अस्मिता पुढील दिवसांत घरात कसं वातावरण निर्माण करणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
